कोरोनानंतर शारिरीक आणि मानसिक ताणतणावामुळे ह्रदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. क्रिकेट खेळताना ह्रदयविकाराचा झटका येऊन एका 32 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
विजय पटेल असं मयत तरुणाचं नाव असून, जालना शहरातील ‘फ्रेजर बॉईज’ मैदानावर ख्रिसमस निमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेतील सामन्यादरम्यान हा धक्कादायक प्रसंग घडला.
सामन्यादरम्यान, विजय पटेल सिक्सर मारल्यानंतर आपल्या सहकारी फलंजासोबत चर्चा करत होता, आणि काही क्षणांतच तो अचानक खाली कोसळला.
मैदानावरील सहकारी खेळाडूंनी तत्परतेने त्याला रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा जीव गमावला.
या दुर्दैवी घटनेमुळे क्रिकेटच्या मैदानावर दुःखाचं वातावरण पसरलं असून, सहकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. हृदयविकारासंबंधी जागरूकता आणि शारिरीक तंदुरुस्तीच्या महत्वावर प्रकाश टाकणारी ही घटना आहे.