---Advertisement---

जिल्हा बँकेत ३९ हजार शेतकऱ्यांची परतफेड, शून्य टक्केअंतर्गत ६० कोटींची शेतकऱ्यांना व्याज सवलत

by team
---Advertisement---

जळगाव : जिल्हा बँकेतर्फे ४१ हजार शेतकऱ्यांना थेट, तर ८७७ विकासोमार्फत असे १ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना १ हजार ५२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले होते. त्यात थेट कर्ज पुरवठादारांपैकी ३९ हजार शेतकऱ्यांनी परतफेड केली आहे. तसेच ८८७ पैकी १६६ वि. का. सोसायट्यांची ३१ मार्च या आर्थिक वर्षअखेरीस १०० टक्के पीककर्ज परतफेड झाली आहे. यात एकूण १ लाख ३५ हजार शेतकरी सभासदांनी ९२५ कोटी रुपये कर्जाचा भरणा केल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे विकासोच्या शेतकरी सभासदांना शून्य टक्के व्याज सवलतीने पीककर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. तर या वर्षीदेखील जिल्हा बँकेने पीककर्जदार शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत रकमेवर शून्य टक्के व्याज सवलत लागू केली आहे. ५ लाखांपर्यंत पीककर्ज मर्यादा वाढवा या वर्षी पीककर्जदार शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजाची सवलत दिली जात आहे. ही मर्यादा खूपच कमी असून ती पाच लाखांपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली असून केंद्र व राज्य सरकारने तसा निर्णय जाहीर करावा, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी म्हटले आहे.

केंद्राकडे ६० कोटी थकीत
केंद्र सरकारकडून दोन वर्षांपूर्वीचे व्याजाचे थकीत असलेले ६० कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत, असे असताना शेतकरी हितासाठी संचालक मंडळाने या वर्षीदेखील व्याजमाफीची योजना राबविली आहे.

ओटीएस सवलतीनंतर होणार कारवाई
जिल्हा बँकेतर्गत विकासोच्या विविध शाखांमधील ८० हजार शेतकऱ्यांकडे ५५० कोटी रुपयांची पीक कर्जाची रक्कम थकीत आहे. या थकीत रकमेच्या वसुलीसाठी एकरकमी भरणा करण्याची ओटीएस सवलत मोहीम राबविण्यात येणार आहे. मात्र त्यानंतरही भरणा झाला नाही, तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाने दिला आहे. पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात परतफेड नाममात्र धरणगाव तालुक्यात एक तर एरंडोल तालुक्यात एकही विकासोमध्ये १०० टक्के परतफेड भरणा झालेला नाही. तसेच पालकमंत्री. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, आजी व माजी उपाध्यक्षांच्या तालुक्यात पीककर्ज परतफेड भरणा स्थिती मात्र नाममात्र आहे.

शून्य टक्के व्याजाचा शेतकऱ्यांना लाभ
२०२४-२५ या आर्थिक वर्षात १ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना १ हजार १६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांनी ९२५ कोटी रुपये पीककर्जाची परतफेड केली आहे. शून्य टक्के व्याज सवलतीतून ६० कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे.

थेट कर्ज पुरवठ्याचे २४५ कोटी वसूल होणार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४९ हजार शेतकऱ्यांना २४५ कोटी रुपयांचा पेट कर्जपुरवठा केला होता. त्यापैकी ३६ हजार शेतकऱ्यांनी २२० कोटी रुपयांचा भरणा बँकेच्या शाखांमध्ये केलेला आहे. येट कर्ज पुरवठ्याचे २४५ कोटी रुपये वसूल करण्यात येणार आहेत.

१६६ विकासोंची १०० टक्के वसुली
जिल्हा बँकेअंतर्गत स्थानिक विकासो ८७७ असून सर्वात जास्त रावेर ३२, यावल २५. चाळीसगाव १९, चोपडा १६. जळगाव १३, अमळनेर १२. भुसावळ १२, जामनेर ११, तर भडगाव ७, पाचोरा ७, मुक्ताईनगर ७. पारोळा २. बोदवड २, धरणगाव १, अशा १६६ विकासोंमध्ये १०० टक्के पीककर्ज परतफेड भरणा झालेला आहे.

५५० विकासोंचे ३०० कोटींचे कर्ज निर्लेखित
आतापर्यंत जिल्हा बँकेच्या पीककर्जाची २२ टक्के वसुली झाली आहे. या कर्जाची परतफेडीची मुदत नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे ही शंभर टक्के नोव्हेंबर अखेरपूर्वीच वसुली होणार आहे. अनिष्ट तफावतीत गेलेल्या ५५० संस्थांचे ३०० कोटींचे कर्जही निर्लेखित करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment