तरुण भारत लाईव्ह ।०७ फेब्रुवारी २०२३। राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी कोटी ८ ५ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे . त्यातील सुमारे निम्मे रक्कम म्हणजेच सत्तेचाळीस कोटी ८९ लाख रुपये वितरित करण्यास ६फेब्रुवारी रोजी प्रशासकीय मंजुरी दिली .तसा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे . त्यातील ४ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेला मंजूर झाला आहे. त्यापैकी २ कोटी ४१ लाख रुपये निधी पर्यटन विभागाला वितरीत करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यातील २९ विविध योजनांसाठी पर्यटन क्षेत्रांशी संबंधित रस्ते, पाणी, निवास, तलाव, जुन्या इमारतीचे संरक्षण यासह इतर विकासकामांकरिता पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रस्ताव दाखल झालेले होते. त्या अनुषंगाने पर्यटन विभागाचे अवर सचिव संजय जाधव यांनी निधी मंजुरी आणि वितरणासंदर्भातील आदेश आज दिले. विशेष म्हणजे धुळे व जळगाव जिल्ह्यात फक्त श्री मंगळग्रह मंदिरालाच हा निधी मिळाला. सुमारे १० वर्षांपासून या निधी प्राप्ती साठी मंगळ ग्रह सेवा संस्था सातत्याने प्रयत्नशील होती.
हा निधी पर्यटन विभागाकडे वर्ग झाला आहे. पर्यटन विभाग शासकीय नियम व निकषांन्वये निविदा काढून विकास कामे करेल.