शिवरे विद्यालयातील ४२ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

पारोळा : तालुक्यातील शिवरे दिगर येथील सारंग माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्ताने १३ रोजी दुपारी ‘भंडारा’ ठेवण्यात आला होता. त्या भंडाऱ्यात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने सुमारे ४२ विद्याथ्यर्थ्यांना विषबाधा झाली. त्यांना कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांना जेवण केल्यानंतर उलट्या, मळमळ, चक्कर त्रास होऊ लागल्याने त्यांना तामसवाडी येथून पारोळा येथे हलविण्यात आले. साधारण सायंकाळी पाच वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होते. अन्नातूनच विषबाधा झाला असल्याचे समजते.

सुरुवातीला २० ते २५ विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. साधारण ४० ते ५० विद्यार्थ्यांना या जेवनातून बाधा झाली. पारोळा कुटीर रुग्णालय त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. दरम्यान, पालकासह बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

या सर्व बालकांवर पारोळा कुटीर रुग्णालयातील व शहरातील खाजगी डॉक्टरांनी धाव घेतली व त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत रणाळे, डॉ. निखिल बोहरा, डॉ. कुणाल पाटील, डॉ. सुनील पारोचे, डॉ. चेतन करोडपती, डॉ. भूषण चव्हाण, डॉ. वैशाली नेरकर, डॉ. योगेंद्र पवार, डॉ. सुरेश पाटील, डॉ. गोपाल शिंपी, डॉ. पी. जी. पाटील, डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. मिलिंद श्राफ, डॉ. महेश पाटील, डॉ. महेश पवार, डॉ. गिरीश जोशी, डॉ. महेश पाटील, डॉ. इशान जैन, डॉ. कुलदीप पवार, डॉ. हेमंत मराठे, शहरातील खासगी डॉक्टरांनी उपचार केले.

यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून कुटीर रुग्णालयात डॉक्टरांची तसेच स्टॉप, वार्ड, वाढ करण्याची मागणी केली व रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. डॉक्टरांना योग्य त्या उपचारांची सूचना केली.

रुग्णालयात यांनी दिली भेट
रुग्णालयात आमदार चिमणराव पाटील, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, डॉ. हर्षल माने, डॉ. संभाजी पाटील, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, प्रांत मनीष कुमार गायकवाड, समीर पाटील देवगाव सरपंच, प्रभारी तहसीलदार लक्ष्मण सातपुते, शिवरे पोलीस पाटील तुकाराम पाटील, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, चंद्रकांत चौधरी, पोलीस निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक राजू जाधव, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी भेट देत आढावा घेतला.

असे आहेत विषबाधा झालेले विद्यार्थी
नम्रता मच्छिंद्र कांडेकर, आर. व्ही. संभाजी पाटील, पूर्वी दीपक पाटील, धनश्री दीपक पाटील, दिव्या अमोल पाटील, कौशल्या भिकन जोगी (तरवाडे), गायत्री जितेंद्र पाटील, मयुरी ईश्वर पाटील, प्रणाली सुभाष पाटील, तनुश्री प्रदीप पाटील, विशाल संजय निकम, कृष्णा प्रल्हाद पाटील, अंजली योगेश पाटील, पल्लवी विलास पाटील, जयेश ब्रिजलाल पाटील, राकेश किशोर पाटील, आदित्य गोरख कांडेकर, दिव्या उत्तम पाटील, दर्शना ब्रिजलाल पाटील, वेदांत बुराजी कांडेकर, कोमल समाधान पाटील, जगदीश अरुण पाटील, घनश्याम विठोबा पाटील, अक्षय विठोबा पाटील, घनश्याम निंबा पाटील, अक्षय निंबा पाटील, सागर अनिल भिल, अर्जुन महादराव पाटील, अश्विनी भिला शेळके, नंदिनी बारकू पाटील, माधुरी शेळके, प्रेरणा अनिल कोळी, चैताली माधवराव पाटील, वैष्णवी अशोक पाटील, भूषण डोंगर भिल, समाधान रवींद्र सरदार, साधना नारायण मिस्तरी, दुर्वेश आनंदा पाटील, जगदीश अरुण पाटील, कुणाल सुपडू बेलेकर, सोपान राजाराम भिल, कोमल समाधान पाटील आदी.