---Advertisement---

Boat Accident : ‘छुप्या’ मार्गाने यूरोप गाठणे पडले महागात, 44 पाकिस्तानींना जलसमाधी

by team
---Advertisement---

Boat Capsized Near Morocco : स्पेनला जाण्याच्या प्रयत्नात मोरोक्कोजवळ 80 स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने 40 हून अधिक पाकिस्तानी स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मानवी तस्करी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

वृत्तानुसार पश्चिम आफ्रिकेतून स्पेनला जाणारी एक बोट प्रवासादरम्यान बेपत्ता झाली होती. या घटनेत बेकायदेशीरपणे युरोपला जाणारे 44 पाकिस्तानी नागरिक अटलांटिक महासागरात बुडाल्याची माहिती आहे. पाकिस्तानी वेबसाइट डॉनने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आफ्रिकेतून स्पेनला जाणारी एक बोट मोरोक्कोमधील डाखला बंदराजवळ बुडाली. या बोटीवर 80 हून अधिक लोक होते. यामध्ये 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यात बहुतांश पाकिस्तानी आहेत.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, मोरोक्कोमधील दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “रबत (मोरोक्को) मधील आमच्या दूतावासाने आम्हाला कळवले आहे की मॉरिटानियाहून निघालेल्या अनेक पाकिस्तानी नागरिकांसह 80 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट मोरोक्कोच्या डाखला बंदराजवळ उलटली आहे.” पाकिस्तानींसह अनेक वाचलेले दखलाजवळच्या छावणीत मुक्कामी आहेत. बोट उलटण्याच्या घटनेच्या एक दिवस आधी असाच अपघात घडला होता. मोरक्कनच्या अधिकाऱ्यांनी एका दिवसापूर्वीच एका बोटीतून 36 जणांची सुटका केली होती. ही बोट 2 जानेवारी रोजी 86 प्रवासी घेऊन मॉरिशसहून निघाली होती. या स्थलांतरितांमध्ये 66 पाकिस्तानींचाही समावेश आहे. वॉकिंग बॉर्डर्सच्या सीईओने सोशल मीडियावर माहिती दिली आहे की बुडालेल्यांपैकी 44 लोक पाकिस्तानचे आहेत.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment