“उत्तर प्रदेशात मुस्लिम सर्वात सुरक्षित आहेत,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी म्हटले की, “१०० हिंदू कुटुंबांमध्ये एक मुस्लिम कुटुंब सर्वात सुरक्षित आहे. प्रत्येकाला त्यांच्या धार्मिक प्रथा पाळण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, १०० मुस्लिम कुटुंबांमध्ये ५० हिंदू सुरक्षित राहू शकतात का? याचे उत्तर ‘नाही’ असे आहे.”
मुख्यमंत्री योगी यांनी यावेळी बांगलादेश आणि पाकिस्तानचा उल्लेख करत सांगितले की, या देशांमध्ये हिंदूंची स्थिती काय आहे हे जगासमोर स्पष्ट आहे. २०१७ मध्ये भाजपने उत्तर प्रदेशात सत्ता स्वीकारल्यानंतर जातीय दंगली थांबल्या असल्याचा दावा त्यांनी केला.
संभलमधील हिंदू तीर्थस्थळांचा शोध सुरू
संभल जिल्ह्यातील धार्मिक स्थळांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, “संभलमध्ये ५४ हिंदू तीर्थस्थळे ओळखली गेली आहेत. आम्ही या सर्व स्थळांचा शोध घेऊन जगाला येथे घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती देणार आहोत.”यावेळी इस्लामच्या शिकवणीचा दाखला देत ते म्हणाले, “जर एखाद्या हिंदू मंदिरावर प्रार्थनास्थळ बांधले गेले असेल तर इस्लाम त्याला मान्यता देत नाही. मग अशा प्रकारे वागणे हे इस्लामविरुद्ध नाही का?”
होळीवरून दुहेरी मापदंड
होळीच्या काळात संभलमधील मशिदींना ताडपत्रीने झाकण्याच्या निर्णयावरही योगी आदित्यनाथ यांनी आपले मत व्यक्त केले. “होळी खेळल्यामुळे कोणाची ओळख खराब होते का? मोहरमच्या मिरवणुका काढल्या जातात, तेव्हा त्यांची सावली हिंदू मंदिरांवर किंवा घरांवर पडत नाही का? मग याबाबत आक्षेप का घेतला जात नाही?” असा सवाल त्यांनी केला.
होळीचा आदल्या दिवशी पोलिसांनी चुचना काढल्या होत्या त्यावर त्यांनी भाष्य केले “कुणावरही जबरदस्तीने रंग लावू नये, अशी कडक सूचना देण्यात आली आहे. अनेक मुस्लिम बांधव आमच्यासोबत आनंदाने होळी खेळतात, मग हा विरोध का?” त्या सोबतच संभल येथील शाही जामा मशिदीचे अध्यक्ष जफर अली यांनी १४ मार्च रोजी होळी उत्सव असल्याने शुक्रवारची नमाज दुपारी २.३० वाजता घेण्याचा निर्णय घेतला होता. मशिदींना ताडपत्रीने झाकण्याचा निर्णय घेतला. आणि मशिदी झळकल्या गेल्या होत्या.
व्हाट्सऍप्स ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी व्हाट्सऍप्स चॅनलला फॉलो करा