जिल्हयातील 3 लक्ष 87 हजार विमाधारकांसाठी 523 कोटी निधीस मान्यता ! : पालकमंत्री पाटलांचा पाठपुरावा

जळगाव : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 अतंर्गत उत्पन्नावर आधारीत जिल्हयातील 3 लक्ष 87 हजार विमाधारकांसाठी 523 कोटी निधीस मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा केला होता.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत खरीपातील पिकांचा उत्पन्नावर आधारीत जिल्हयातील 4 लक्ष 56 हजार 128 शेतक-यांनी विमा उतरविला होता. या विमाधारक शेतक-यांना लाभ मिळणेसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी व कृषि विभागासोबत वेळोवेळी बैठका घेवून विमा कंपनीला निदेर्श दिले होते. त्यानुसार विमा कंपनीने 3 लक्ष 87 हजार 973 शेतकरी पात्र केले असून त्यासाठी ओरिएंटल इंडीया इंन्सुरंन्स कंपनीमार्फत 523 कोटी 28 लक्ष निधीस कंपनीकडुन मान्यता देण्यात आली आहे. आजपर्यंत जिल्हयात सर्वाधीक पीक विमा निधी मंजुर झालेला आहे. याबाबत आजच्या कॅबीनेटच्या बैठकीत सदर रक्कम शेतक-यांच्या बॅक खात्यात थेट जमा करणेसाठी शासनाने विमा कंपनीस वर्ग करणेबाबत मागणी केली. यामुळे  शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्हयातील तालुकानिहाय मंजुर शेतकरी संख्या व त्याची रक्कम

अमळनेर – 55 हजार 824 शेतक-यांसाठी, 36 कोटी 10 लक्ष, भडगाव – 23 हजार 771 शेतक-यांसाठी, 11 कोटी 84 लक्ष, भुसावळ – 8 हजार 476 शेतक-यांसाठी, 7 कोटी 55 लक्ष, बोदवड – 12 हजार 959 शेतक-यांसाठी, 17 कोटी 84 लक्ष, चाळीसगाव – 57 हजार 589 शेतक-यांसाठी, 112 कोटी, चोपडा – 31 हजार 526 शेतक-यांसाठी, 51 कोटी 21 लक्ष, धरणगाव – 10 हजार 533 शेतक-यांसाठी, 47 कोटी 95 लक्ष, एरंडोल – 23 हजार 676 शेतक-यांसाठी, 15 कोटी 21 लक्ष, जळगाव – 12 हजार 558 शेतक-यांसाठी, 4 कोटी 90 लक्ष, जामनेर – 57 हजार 964 शेतक-यांसाठी, 14 कोटी 4 लक्ष, मुक्ताईनगर – 2 हजार शेतक-यांसाठी,  9 लक्ष 51 हजार, पाचोरा – 46 हजार 116 शेतक-यांसाठी 93 कोटी 58 लक्ष, पारोळा – 40 हजार 40 शेतक-यांसाठी, 20 कोटी 94 लक्ष, रावेर –  890 शेतक-यांसाठी, 50 लक्ष 87 हजार, यावल – 7 हजार 51 शेतक-यांसाठी 5 कोटी 91 लक्ष असे एकुण 3 लक्ष 87 हजार 973 शेतक-यांसाठी 523 कोटी 28 लक्ष 05 हजार 389 रुपये निधी ओरिएंटल इंन्सुरंन्स इंडीया लि. कंपनीने मंजुर केलेला आहे.  यामुळे  शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावर्षी जिल्ह्यातील विमाधारक  शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड सीजन ऍडव्हर्सिटी 25टक्के) अग्रीम हा जिल्ह्यात 82 कोटी 52 लाख वितरित झालेला आहे. तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती खरीप हंगाम 2023 करिता जिल्ह्यातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना 50 कोटी 11 लाख रुपये वितरीत करण्यात आलेले आहे. उत्पन्नावर आधारीत खरीप हंगाम 2023 करीता नुकतीच मंजुर झालेली 523 कोटी इतकी रक्कम ही कंपनीमार्फत वर्ग करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कृषि विभागाने सांगीतले.

 

शेतकरी बांधवाना पालकमंत्र्यांचे आवाहन

प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असली तरी विमा हप्ता नाममात्र एक रुपया इतका कमी असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2024 करिता याचा लाभ घ्यावा असे आव्हान माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामार्फत करण्यात येत आहे विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख ही 31 जुलै 2024 असली तरी पिक विमा नोंदणीच्या शेवटच्या दिवसातील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या जवळच्या CSC/VLE केंद्र, बँका अथवा शेतकरीही पीक विमा नोंदणी करता येते. आपले सरकार सुविधा केंद्र धारकास विमा कंपनी मार्फत प्रती अर्ज रु 40 प्रमाणे रक्कम अदा करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही याची नोंद घ्यावी. असे नम्र आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.