जळगाव : पावसाळाच्या दिवसात सर्प मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्प मित्रांना दहा दिवसात ५३ सापांचा जीव वाचविण्यात यश मिळाले.
नाग, घोणस,, मण्यार या विषारी एसआरपी प्रजाती सोबतच बिन विषारी भारतीय अजगर, धामण, दिवड, तस्कर, रुकां सर्प, निम विषारी भारतीय अंडी खाऊ सर्प अशा विविध प्रजातीचे ५३ साप आढळले. या सर्व सापांना सुरक्षित अधिवासात सर्पमित्रांनी सोडले.
विहीर, घराच्या कंपाउंडमधील शेडच्या लोखंडी अँगलपाईप, बाधरुम, शाळेतील कॅन्टीन, घरी पडलेल्या रिकाम्या पीव्हीसी पाईप, दरवाजा मागील बाजू,, अडगळ अशा विविध ठिकाणी हे साप आढळून आले. संस्थेच्या सर्पमित्रांनी या सापांना रेस्क्यू करुन योग्य अधिवासात सोडले. या मोहिमेत संस्था अध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, राहुल सोनवणे, योगेश गालफाडे, सतीश कांबळे यांचे सहकार्य लाभले.
शेत बांधावर शाळेत शून्य सर्पदंश अभियान
वन्यजीव संरक्षणसंस्थेतर्फे नागपंचमीला, शुक्रवार, ९ रोजी शाळा, शेतीच्या बांधावर जाऊन शून्य सर्पदंश जनजागृती अभियान राबविण्यात आले. यामध्ये दोन हजार विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेतला. शहरातील शारदाश्रम विद्यालय पर्यावरण शाळा याठिकाणी जनजागृती अभियानात शाळेतील ३०० विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले. विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवरुन सापांची माहिती दिली. तसेच सर्पसंदर्भात गैरसमज दूर केले.
सर्पदंशेने घाबरु नका
चिंचोली येथे जि.प. माध्यमिक शाळेत सर्पमित्रांनी विषारी, बिनविषारी सापाची ओळख करुन दिली. सर्प घरात येऊ नये, यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत टिप्स दिल्या. सर्पदंश झालाच, तर न घाबरता प्रथमोपचार करावे, तसेच कशी दक्षता घ्यावी, याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
करंज येथे रामनाथ बाबा माध्यमिक विद्यालयात सर्पमित्रांनी जनजागृती केली. प्रथोमपाचर, सापाबद्दल गैरसमज यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. कासोदा येथील भारती माध्यमिक विद्यालयात अभियानात ८०० विद्यार्थी सहभागी झाले. साप का येतो, काळजी कशी घ्यावी, साप येवू नये यासाठी उपाययोजनेची माहिती दिली. सर्पमित्र तथा संस्थेचे सचिव योगेश गालफाडे, राजेश सोनवणे, जगदीश बैरागी, मुकेश सोनार, हेमराज सपकाळे, योगेश पाटील, प्रदीप शेळके, अशोक खामकर, विनोद सोनवणे तसेच वन्यजीव सदस्य दिनेश सपकाळे, ज्ञानेश्वर सपकाळे, रितेश भोई यांनी जनजागृती अभियान राबविले. याकामी वन्यजीव संरक्षण संस्था अध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, राहुल सोनवणे, योगेश गालफाडे, सतीश कांबळे यांचे सहकार्य लाभले.