भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने जुलै महिन्यात रेल्वे गाड्यासह विविध रेत्वे स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवित नऊ हजार फुकट्या प्रवाशांकडून ५५ लाखांचा दंड वसूल केला आहे. अन्य उत्पन्न मिळून विभागाने ७८ कोटी ६७ लाखाचे उत्पन्न मिळवले. भुसावळ विभागाच्या डीआरएम ईती पांडे यांच्यासह वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अजयकुमार मार्गदर्शनाखाली विभागातील विविध रेल्वे स्थानके, विभागातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये विशेष तपासणी पथकाच्या माध्यमातून प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात आली. यात आरक्षण नसतानासुध्दा आरक्षण डब्यातून प्रवास करणारे, विना तिकीट प्रवास करणारे, ऑनलाईन तिकीट कन्फर्म नसतानाही प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरूध्द धडक कारवाई करण्यात आली.
७८.६७ कोटींचा महसूल प्राप्त
प्रवासी महसुलाच्या बाबतीत भुसावळ विभागाला जुलैमध्ये ७८.६७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. या उत्पन्नात तिकीट तपासणी विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. एकूण नऊ हजार प्रवाशांवर केसेस करीत त्यांच्याकडून ५५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. विविध कोचिंगमधून मिळणाऱ्या महसुलातही जुलै महिन्यात लक्षणीय वाढ झाली. ही वाढ तीन कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विविध सेवा देण्याच्या विभागाच्या माध्यमातून सुध्दा माल वाहतुकीद्वारे ४६ कोटी ४३ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मालगाड्यांनी मोटारगाड्या, पेट्रोलियम उत्पादने, कांदे, अन्नधान्य आणि सिमेंट वॅगनसह विविध प्रकारच्या मालाची वाहतूक केली आहे. पार्सल सेवेने एकूण चार कोटी रुपयांचा महसूल मिळवला. याव्यतिरिक्त इतर विविध व्यावसायिक क्रियाकलापांमधून विविध महसूल ३ कोटी ५० लाख के आहे, ज्यामुळे विभागाच्या आर्थिक उत्पन्नात आणखीच भर पडली. ही कामगिरी संपूर्ण टीमने केली आहे. डीआरएम इति पांडे, वरिष्ठ विभागीय ४ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार के यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय सहभाग यामुळे विभागाची प्रशंसनीय कामगिरी ठरली आहे.
शेगाव, भुसावळला बॅटरी कार
जुलै महिन्यात प्रवासी सुविधेसाठी भुसावळ आणि शेगाव स्थानकांवर बॅटरी कार सुविधा सुरू प्र करण्यात आली आहे. या सुविधांमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तीं, म महिला आणि आजारी व्यक्तींसाठी प मोठी मदत होणार आहे. दादर- नंदुरबार विशेष गाडीचा भुसावळपर्यंत विस्तार करण्यात आल्याने प्रवाशांची सुविधा झाली आहे.