---Advertisement---

टॅरिफ टाळण्यासाठी भारतातून ६०० टन आयफोन अमेरिकेत केले एअरलिफ्ट

by team
---Advertisement---

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफचा फटका टाळण्यासाठी टेक जायंट ॲपल कंपनीने भारतातून तब्बल ६०० टन आयफोन अमेरिकेत स्पेशल कार्गो विमानातून एअरलिफ्ट केले आहेत. यातून जवळपास १५ लाख आयफोन अमेरिकेत रवाना केले आहेत. अमेरिका ही आयफोन्सची सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे.

ट्रम्प टॅरिफ्स टाळण्यासाठी आणि अमेरिकेत आयफोन्सचा मोठा साठा करता यावा यासाठी ॲपल कंपनीने हे पाऊल उचलल्याचे दिसत आहे. व्यापार विश्लेषकांनी नुकताच इशारा दिला होता की, आयफोनच्या किंमती अमेरिकेत झपाट्याने वाढू शकतात. कारण आयफोन्सची आयात मोठ्या प्रमाणात चीनमधून होते. आता ट्रम्प यांनी चीनवर १२५ टक्के टैरिफ लावले आहे. त्यामुळे अर्थातच अमेरिकेत आयफोन्सच्या किंमती वाढणार. पण त्यापुर्वीच आयफोन्सचा मोठा साठा ॲपलने भारतातून अमेरिकेत नेला आहे.

असे होते ॲपलचे नियोजन

कंपनीने चेन्नई विमानतळावर कस्टम क्लिअरन्ससाठी लागणारा वेळ ३० तासांवरून सहा तासांपर्यंत कमी करण्यासाठी भारतीय विम नितळ अधिकाऱ्यांकडे प्रयत्न सुरू केले. या कथित “ग्रीन कॉरिडॉर” व्यवस्थेची अंमलबजावणी ने चीनम धील काही विमानतळांवरही केली होती. मार्चपासून सुमारे १०० टन क्षमतेच्या सहा मालवाहू विमानांनी भारतातून उड्डाणे केली केली आहेत. त्यापैकी एक विमान या आठवड्यात उड्डाण करताना नवीन टैरिफ लागू झाले, अशी माहिती आहे.

एकंदरीत टॅरिफ आधीच माल अमेरिकेत न्यायचे ॲपलचे नियोजन होते. १४ आणि त्याच्या चार्जिंग केबलसह पॅकेजचे वजन सुमारे ३५० ग्रॅम आहे. त्यामुळे ६०० टनाच्या कार्गोमध्ये सुमारे १५ लाख होते, असे गृहित धरता येते. दरम्यान, आणि भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने या संदर्भात काहीही टिप्पणी केलेली नाही. अमेरिकेत येणाऱ्या आयफोन्सपैकी २० टक्के भारतातून निर्यात होतात ॲपल दरवर्षी जगभरात २२० दशलक्षाहून अधिक आयफोन्स विकते.

आयफोनची किंमत वाटणार

दरम्यान, ट्रम्प यांनी चीनवरील टेरिफ वाढवून १२५ टक्के केले. जे पूर्वी ५४ टक्के होते. ५४ टक्के टैरिफ दराने, अमेरिकेत आयफोन-१६ जो सध्या १५९९ डॉलरला आहे, त्याची किंमत २३०० डॉलरपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment