पंढपुरात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मध्यमप्रतिनिधीसोबत बोलतांना विविध विषयांवर मांडली मत मांडले. सगे सोयऱ्यांना आरक्षण देण्याबाबत अंलबजावणी झाली नाही तर सर्व जातीच्या लोकांना सोबत घेत मी विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच राज्यातील 288 जागांवर उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे.याला उत्तर देतांना दानवे यांनी आम्ही लोकसभेत ४५ पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला. विधानसभेची निवडणूक ते लढणार असे जरांगेंनी सांगितल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.
नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यांनी भाजपला एकेकाळी संघाची गरज लागत होती. पण, आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो, असे वक्तव्य केले. यावर रावसाहेब दानवे यांना विचारले असता ते म्हणाले की, संघाबाबत नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला. त्यांना वाटत असेल संघ आणि भाजपमध्ये वाद होईल पण असे घडणार नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
कोठेही परिणाम नाही
ते पुढे म्हणाले की, मनोज जरांगे यांच्यावर एसआयटी नेमली नसून ती घटनेवर होती. जरांगे यांनी मोदींवर केलेली टीका ही भाषण करतानाची होती. जरांगे यांनी कोणाला पाडा सांगितले नव्हते. फडणवीस यांच्यावर टीका केली कारण लाठीहल्ला हा त्यांच्या गृहविभागाने केल्याने तो राग जरांगेंना असेल. मात्र जरांगे यांचा परिणाम कोठेही नाही. महायुती राज्यात 45 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.