---Advertisement---

यावल मधील ६३ ग्रामपंचायत सरपंचपदासाठी आज आरक्षण सोडत

---Advertisement---

यावल : यावल तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींपैकी ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत सोमवारी (२१ एप्रिल) निघणार आहे. दुपारी दोन वाजता यावल तहसील कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. त्या-त्या ग्रामपंचायतीतील नागरिकांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

६३ ग्रामपंचायतींसाठी आज आरक्षण सोडत

यावल तालुक्यात ६७ग्रामपंचायती आहेत. यातील चार ग्रामपंचायतीचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे, तर उर्वरित ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोमवार, २१ एप्रिल रोजी जाहीर केले जाणार आहे. सातोद रस्त्यावरील तहसील कार्यालयात दुपारी दोन वाजेपासून आरक्षण सोडत प्रक्रिया प्रांताधिकारी बबन काकडे, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर
यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू होईल. यात एकूण पदांपैकी एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. यात अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांचा समावेश आहे.

तालुक्यात अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकूण पदे ८. अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे २१, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे दोन, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे ३२ असे आहेत. यातून अनुसूचित जातीच्या महिलांसाठी चार, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ११, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी एक, सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी १६ असे एकूण ६३ पैकी ३२ जागा महिलांसाठी आरक्षीत केल्या जणार आहे.

या ग्रामपंचायतीचे निघेल आरक्षण

भालशीव, सातोद, बोरावल बुद्रुक, चिखली खुर्द, कोळन्हावी, महेलखेडी, मोहरळे, उंटावद, पिंप्री, कोळवद, वढोदे, किनगाव बुद्रुक, बोरखेडा बुद्रुक, पिळोदे खुर्द, सावखेडेसिम, कोसगाव, चुंचाळे, मारुळ, शिरागड, बामणोद, कासवे, पाडळसे, वड़ी खुर्द, साकळी, कासारखेडा, सांगवी खुर्द, नायगाव, विरोदा, आडगाव, न्हावी, गिरडगाव, हंबर्डी, डांभुर्णी, भालोद, शिरसाड, बोरावल खुर्द, दूसखेडा, म्हैसवाडी, चिंचोली, पिळोदे बुद्रुक, कोरपावली, चिखली बुद्रुक, मनवेल, चितोडा, वढोदा प्र. सावदा, राजोरा, अंजाळे, दहिगाव, विरावली बुद्रुक, टाकरखेडा, डोंगरकोठरा, पिंपरूड, किनगाव खुर्द, थोरगव्हाण, आमोदे, वनोली, निमगाव, डोणगाव, सांगवी बुद्रुक, नावरे, हिंगोणे, बोराडे व अट्रावल या गावांचे आरक्षण जाहिर होणार आहे.

रावेर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आज निघणार सोडत

रावेर : रावेर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोमवारी (२१ एप्रिल) आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. रावेर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींच्या २०२५ ते २०३० या कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तहसीलदार बी.ए. कापसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, २१ रोजी सकाळी ११ वाजता सोडतीसाठी सभा तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत होईल. रावेर तालुक्यातील खालील नमूद केलेल्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील ८२ ग्रामपंचायतींच्या एक व्दितीयांश सरपंचपदे महिला (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला) यांच्यासाठी सोडत पद्धतीने महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी फैजपूर उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी चार वाजता सोडत सभा तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत रावेर येथे आयोजित करण्यात आली आहे. या वेळी संबंधितांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन तहसीलदार बी.ए. कापसे यांनी केले

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment