पौर्णिमेचा चंद्र ’मायक्रो मून’

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव  : या वर्षी जानेवारी २०२३ च्या पहिल्याच सप्ताहात पौर्णिमा असून चंद्राचे स्वरूप मायक्रोमून अशा स्वरूपात दिसणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी पूर्णस्वरूपात दिसतो. परंतु पूर्ण आणि सुस्पष्ट तसेच किंचीत आकाराने मोठा तो ‘सुपरमून’ असे खगोलीय भाषेत म्हटले जाते. परंतु यावेळी ७ जानेवारी पौणिमेच्या दिवशी ‘मायक्रो मून’चे दर्शन खगोल अभ्यासकांसह सर्वसामान्यांना होणार आहे.

चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा थोडी अंड गोलाकार असल्यामुळे चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सतत बदलत असते. चंद्र पृथ्वीच्या कधी जवळ तर कधी दूर असतो. विज्ञानात खगोलशास्त्र हा सर्वात जास्त मनोरंजक विषय आहे. विविध परिस्थितीत ’दिसणार्‍या किंवा घडणार्‍या खगोलीय घटनांना अदभूत अशी नावे दिली आहेत. त्यातलीच ही एक खगोलीय घटना आहे. यालाच आणि ‘मायक्रो मून’ म्हटले जाते. यात चंद्र आणि पृथ्वी यांतील अंतर जास्त असल्याने चंद्राचे स्वरूप लहान अशा स्वरूपात दिसणार आहे. त्यामुळे चंद्राच्या क्रियेला ‘मायक्रो मून’असे संबोधले जाते. तसेच जवळ असलेल्या बिंदुला पेरिजी आणि दूर असलेल्या बिंदुला अपोजी म्हणतात. चंद्राचे पृथ्वीपासून सरासरी अंतर ३ लाख ८४ हजार ४०० कि.मी. आहे.

पृथ्वीभोवती फिरतांना चंद्र पौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळी पेरिजी बिंदु वर येतो त्यावेळी पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर सगळ्यात कमी म्हणजे ३ लाख ५६ हजार ५०० कि.मी. असते. अंतर कमी झाल्यामुळे इतर दिवशी दिसणार्‍या आकाराच्या तुलनेत चंद्र १४% मोठा आणि ३० % जास्त प्रकाशित दिसतो. आकाराने मोठा दिसणार्‍या पौर्णिमेच्या या चंद्राला ‘सुपरमून’ म्हणतात.
पृथ्वीभोवती फिरतांना चंद्र पौर्णिमेच्या दिवशी अपोजी बिंदु वर येतो. त्यावेळी पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर सगळ्यात कमी असते. विशेषतः, जानेवारीचा सूक्ष्म पौर्णिमा पृथ्वीपासून सुमारे २५२,६०० मैलांवर आहे. म्हणजे ४ लाख ६ हजार ७०० कि.मी. इतके असते. अंतर जास्त झाल्यामुळे इतर दिवशी दिसणार्‍या आकाराच्या तुलनेत चंद्र १४% लहान आणि ३० % कमी प्रकाशित दिसतो. आकाराने लहान दिसणार्‍या या पौर्णिमेच्या चंद्राला ‘मायक्रो मून’ म्हणून ओळखले जाते.

जानेवारीचा पौर्णिमा या वर्षी मायक्रोमून आहे. पौर्णिमेच्या दिवशी पूर्णस्वरूपात दिसतो. परंतु पूर्ण आणि सुस्पष्ट तसेच किंचीत आकाराने मोठा तो सुपरमून अवकाशात दिसतो. परंतु यावेळी ७ जानेवारी रोजी ‘मायक्रो मून’ पौर्णिमा पृथ्वीपासून सर्वात दूरच्या बिंदूवर असल्याचे खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी दिली.