तरुण भारत लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२२ । वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोपडा तालुक्यातील आडगाव येथील आरोपी बाबूलाल बारकू भिल याला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
तालुक्यातील आडगाव येथे दि. १० जानेवारी २०२२ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास एका सहा वर्षाची बालिकेला तिचे आई वडील तिला आजीजवळ सोडून शेतात मजुरीसाठी गेले असताना गावातील आरोपी बाबूलाल बारकू भिल वय २८ याने पीडित सहा वर्षाच्या बालिकेला बोरे खाण्याचे आमिष दाखवून नाल्यात घेऊन गेला. तिचे हात बांधून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत असताना तेथून भावलाल कोळी घराकडे जाताना त्याची नजर या गैरप्रकारकडे गेली. हे पाहताच बाबूलाल तेथून पळून गेला. भाऊलाल याने मुलीच्या आई वडिलांना झाला प्रकार सांगितल्याने आरोपी बाबूलाल विरुद्ध विनयभंग व पोकसो कायद्यांतर्गत ११ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.