---Advertisement---

अवकाळी पावसाचा तडाखा! गारपिटीमुळे ७५० हेक्टर शेतपिकांचे नुकसान

---Advertisement---

जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात विशेषतः पूर्व भागातील विविध तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस व गारपिटीने थैमान घातले होते. यात रावेर, मुक्ताईनगर, बोदवड आणि चोपडा तालुक्यांत ४० गावांमध्ये ७५० हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते. त्यानुसार कृषी व महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्ह्यात गत सप्ताहात शनिवारी सायंकाळी शनिवारी (१२ एप्रिल) रावेर, मुक्ताईनगर व बोदवड या तीन तालुक्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पाऊस झाला. तर रविवारी (१३ एप्रिल) देखील चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे केळी पिकांचे झाले आहे. दरम्यान, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड आणि चोपडा तालुक्यातील नुकसानीची माहिती घेतली जात आहे. हे नुकसान मिळून जिल्ह्यात बेमोसमी पावसासह गारपिटीमुळे या चारही तालुक्यात ४० गावांमधील १ हजार ८५ शेतकऱ्यांचे ७४३ हेक्टर ५५ आर क्षेत्रापर्यंत पिकांचे नुकसान झाले आहे या तालुक्यांमधील नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात आले आहेत.

या चारही तालुक्यांमध्येही ९० टक्के नुकसान केळी बागांसह ज्वारी, मका या पिकांचे झाले आहे. रावेर, बोदवड व मुक्ताईनगर या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यात १९ गावांमध्ये ७३२ शेतकऱ्यांच्या ५१० हेक्टरवर नुकसान झाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात ३ गावांमध्ये ११७ शेतकऱ्यांचे ५५ हेक्टर ४५ आर क्षेत्र बाधित आहे. त्यात सर्वाधिक मका आणि ज्वारीचे नुकसान झाले आहे. बोदवड तालुक्यात ३ गावांमधील ३० शेतकऱ्यांच्या ३१ हेक्टर २० आर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर रविवारी चोपडा तालुक्यातील धानोरा, खेडीभोकरी, अडावद, गोरगावले या गावांमध्ये, तर जळगाव तालुक्यातील भोकर, कठोरा, भादली, गाढोदा, सावखेडा या गावांमध्ये गारपीट झाली. या पट्ट्यातही केळीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. यात चोपडा तालुक्यात १५ गावांत २०६ शेतकऱ्यांचे १०३ हेक्टर ९० आर क्षेत्रात केळी पिकांचे तर मका आणि ज्वारी पिकांचे असे १४६ हेक्टर ९० आर क्षेत्रावरील शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment