Jalgaon Municipal Corporation : महापालिकेतील ९३ कार्यरत कर्मचारी वगळता उर्वरीत ७८८ कार्यरत कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याचे वेतन सातवा वेतन आयोगानुसार 7th Pay Commission आज सक्रांतीला जमा झाले आहे. तर उड्डाणपदोन्नतील १४१ कर्मचारी तूर्तास वेटींगवर आहेत.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा विषय आज मार्गी लागला. डिसेंबर महिन्याच्या वेतनात हा वेतन आयोग लागू करून त्यानुसार पगार करण्यात आलेत.
उड्डाणपदोन्नती धारक वेटींगवर
१४१ कर्मचाऱ्यांना उड्डाण पदोन्नती देण्यात आली होती. यातील ज्यांच्याबाबत लेखापरिक्ष्ाणात आक्ष्ोप आहेत अशा १४१ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबाबत सध्या वेटींगवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा डिसेंबरचा पगार रोखण्यात आला आहे. यास १४१ कर्मचाऱ्यांबाबत कार्यवाही सुरू असून त्यांनाही जानेवारीअखेरपर्यत तो लागू करण्यात येणार आहे. त्याचवेळी त्यांना डिसेंबरचा पगार व सातवा वेतन आयोग असे दोन्ही एकत्र देण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगीतले.
Jalgaon Municipal Corporation : मनपाच्या ७८८ कर्मचाऱ्यांना संक्रांत पावली, सातव्या वेतन आयोगानुसार मिळाला पगार
Updated On: जानेवारी 15, 2024 7:14 pm

---Advertisement---