जळगाव : महानगरपालिकेतील कार्यरत, मयत, सेवानृित्त कर्मचाऱ्यांना कुटूंब निवृत्ती वेतनधारकांना ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या रक्कमा अदा करण्यात यावी अशी मागणी माजी महापौर भारती सोनवणे यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी सोमवार, १ जुलै रोजी आयुक्तांना दिले आहे.
निवेदनाचा आशय असा की, राज्य शासनच्या ३० जानेवारी २०१९ रोजीची अधिसूचने नुसार जळगाव महानगरपालिकेतील कार्यरत, मयत, सेवानृित्त कर्मचाऱ्यांना, कुटूंब निवृत्ती वेतनधारकांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी, २०१६ पासून लागू करण्यात आलेल्या आहेत. यानुसार वेतन, निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्ती वेतन अदा करणेत येत आहे. तसेच ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत २० जून २०२८ रोजीचा शासन निर्णय पारीत झालेला आहे. मात्र जळगाव शहर महानगरपालिकेतील कार्यरत, मयत,सेवानृित्त कर्मचाऱ्यांना, कुटूंब निवृत्ती वेतनधारकांना अद्याप पावेतो एकही थकबाकीचा हप्ता अदा करण्यात आलेला नाही. बहुतांश कार्यरत, सेवानिवृत्त कर्मचारी व कुटूंब वेतनधारक यांना आजारपण व त्यावरील वैद्यकीय खर्च, मुलांचे शिक्षण, लग्न, दैनंदीन कौटुंबीक जीवनावश्यक गरजा भागविणे जीकरीचे झालेले आहे. त्यामुळे त्यांनी कर्मचारी सोसायटी, इत्यादींकडून कर्जाची उचल केलेली आहे. त्याचेही हप्त भरणे कठीण झालेले आहे. त्यामुळे मनपा कर्मचारी, कुटूंब वेतनधारक हे आर्थिक अडचणीत आलेले आहेत. यामुळे शासन निर्णयान्वये या सर्वांना ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या रक्कमा अदा करण्यात याव्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.