मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एका भीषण हत्याकांडाची घटना समोर आली आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या सीमेवर असलेल्या आदिवासीबहुल भागातील माहुलझीर पोलीस ठाण्यांतर्गत बोडलकचार गावात एका आदिवासी कुटुंबातील 8 जणांची सामूहिक हत्या करण्यात आली. कुटुंबातील मुलाने कुऱ्हाडीने वार करून सर्वांची हत्या केली. यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुलाने केलेल्या या भीषण हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी कुटुंबातील युवकाने आई-वडील, पत्नी, मूल आणि भावासह कुटुंबातील आठ जणांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. हत्येनंतर त्याने गळफासही घेतला.
रात्री 2 वाजता ही भीषण हत्या घडली
ही घटना मंगळवारी रात्री उशिरा २-३ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. माहुलझीर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण गाव सील केले आहे. छिंदवाडा येथील पोलीस अधीक्षक घटनास्थळी रवाना झाले आहेत. अजून माहितीची प्रतीक्षा आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.