मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता सर्वांचे उद्या शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे लक्ष लागलेले असताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा त्यांनी सोशल मीडियाद्वारे करत वंचित बहुजन आघाडीला जास्त संख्याबळ मिळाल्यावर ते सत्ता स्थापन करणाऱ्यांसोबत राहतील असे स्पष्ट केले आहे.
‘X’ या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे की, जे काही सरकार स्थापन होईल, त्या बहुमताला पाठिंबा देऊन एकत्र येऊ, मग ते महा विकास आघाडी असो वा महायुती.
प्रकाश आंबेडकर यांची त्यांची ‘X’ वरील पोस्ट, वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्या इतक्या जागा मिळाल्या तर जो सरकार बनवू शकतो आम्ही त्यांच्यासोबत राहू ”
वास्तविक, यावेळी दोन्ही आघाड्यांमधील घटक पक्षांमध्ये चुरशीची स्पर्धा असली तरी यावेळी अनेक छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होत असल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत आता हे छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार कोणाला पाठिंबा देणार, अशी चर्चा रंगली आहे.