Raver : रावेर विधानसभा मतदारसंघातून 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

#image_title

Raver assembly constituency : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत लढत होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता.

जळगाव जिल्यातील रावेर विधानसभा मतदारसंघातून आज 14 जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता रावेर मतदारसंघातून नऊ उमेदवारांमध्ये हि लढत होणार आहे.

रावेर विधानसभा मतदारसंघातून हे उमेदवार रिंगणात
रावेर विधानसभा निवडणूकीत शेवटच्या दिवशी चौदा उमेदवारांनी माघार घेतली असुन 9 उमेदवार रिंगणात आहे. यात भाजपचे अमोल हरीभाऊ जावळे, काँग्रेसकडून धनंजय शिरीष चौधरी, प्रहार कडून अनील छबिलदास चौधरी, वंचित बहुजन आघाडीच्या शमिभा भानुदास पाटील, बसपा, नारायण हिरामण अडकमोल, एमआयएम कडून आरिफ खालिक शेख, ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी कडून खल्लोबाई युनूस तडवी, आजाद समाज पार्टी कडून मुस्ताक कमाल मुल्ला, तर अपक्ष दारा मोहंमद जफर मोहंमद असे 9 उमेदवार रिंगणात आहे.