नाशिक: शेअर्स मार्केटमध्ये मोठा तोटा झाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या रवींद्र शिवाजी कोल्हे (वय ३०, रा. विटाई, ता. चांदवड) या तरुणाने आत्महत्या केली. बुधवारी (ता. २८) सातपूर परिसरात स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतः ला पेटवून घेतले गंभीर भाजलेल्या कोल्हे यांचा तीन दिवसांनी, उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणुकीचा फटका
रवींद्र कोल्हे हे मूळचे चांदवड तालुक्यातील विटाई गावचे रहिवासी असून, काही काळापासून नाशिकच्या खुटवडनगर परिसरात वास्तव्यास होते. त्यांनी सुरुवातीला एका खासगी विमा कंपनीत नोकरी केली. त्यानंतर ते एका खासगी बँकेत कार्यरत झाले.
नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून अधिक लाभ मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मात्र, शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे त्यांना तब्बल १६ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. या आर्थिक फटक्यामुळे ते मोठ्या मानसिक तणावाखाली होते.
सातपूरमध्ये आत्महत्या ; उपचारादरम्यान मृत्यू
आर्थिक संकटामुळे तणावग्रस्त झालेल्या कोल्हे यांनी बुधवारी सातपूर परिसरात स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन केले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, ९८ टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर बनली होती. तीन दिवस उपचार सुरू असताना, शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.
आर्थिक अडचणीमुळे वाढता आत्महत्येचा धोका
शेअर्स मार्केटमध्ये मोठा नफा मिळवण्याच्या अपेक्षेने अनेक गुंतवणूकदार मोठी रक्कम लावतात. मात्र, बाजारातील चढ-उतार आणि नुकसान सहन करण्यासाठी मानसिक तयारी नसल्यास अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसाक्षरता आणि योग्य गुंतवणूक सल्ल्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
कमावलेली पुंजी गमावली; शेअर बाजारातील तोट्याने तरुणाने स्वतःला पेटवून जीवन संपवलं
by team
Published On: मार्च 1, 2025 11:32 am

---Advertisement---