---Advertisement---

उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणत्या संघाविरुद्ध ? जाणून घ्‍या समीकरण

by team
---Advertisement---

लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी गाठणारा तिसरा संघ ठरला आहे. शुक्रवारी (28 फेब्रुवारी) लाहोरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला. यामुळे ऑस्ट्रेलियाने 4 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला.

भारत आणि न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे. आता चौथ्या संघाचा निर्णय दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील शनिवारी (1 मार्च) होणाऱ्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. मात्र, अंतिम साखळी सामन्यानंतरच भारताचा उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी कोण असेल हे स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा : कमावलेली पुंजी गमावली; शेअर बाजारातील तोट्याने तरुणाने स्वतःला पेटवून जीवन संपवलं

भारताचा पहिला उपांत्य सामना दुबईत
भारताने गट ‘अ’ मधून उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली असून, पहिला उपांत्य सामना दुबई येथे खेळणार आहे. गट ‘अ’ मधून भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी (2 मार्च) होणाऱ्या शेवटच्या साखळी सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने असतील.

उपांत्य फेरीत भारताचा मुकाबला कोणत्‍या संघाशी होणार ?
गट ‘अ’ मधील अव्वल संघ उपांत्य फेरीत गट ‘ब’ मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी लढेल.
गट ‘अ’ मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ गट ‘ब’ मधील अव्वल संघाविरुद्ध खेळेल.
सध्या न्यूझीलंडचा नेट रन रेट भारतापेक्षा चांगला असल्याने ते गट ‘अ’ मध्ये पहिल्या स्थानावर आहेत. जर भारताने न्यूझीलंडविरुद्धचा सामना हरला, तर दुबईतील उपांत्य सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाशी लढावे लागेल.

दक्षिण आफ्रिकेच्या पराभवावर अफगाणिस्तानच्या आशा अवलंबून
चौथ्या उपांत्य फेरीतील संघाचा निर्णय आज (1 मार्च) दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावर अवलंबून आहे. अफगाणिस्तानच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा अजूनही शाबूत आहेत, परंतु यासाठी दक्षिण आफ्रिकेचा मोठा पराभव होणे आवश्यक आहे.

उपांत्य फेरीतील संभाव्य सामने

भारताने न्यूझीलंडचा पराभव केल्यास
भारत गट ‘अ’ मध्ये अव्वल स्थान मिळवेल.
भारत गट ‘ब’ मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी सामना करेल.

भारत पराभूत झाल्यास
भारत गट ‘अ’ मध्ये दुसऱ्या स्थानावर जाईल.
भारताला उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागेल.

दक्षिण आफ्रिकेचा मोठा पराभव झाल्यास
अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळेल.
मात्र, हे शक्य होण्यासाठी इंग्लंडने मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment