पारोळा : येथील सागर ट्रेडर्स या कृषी केंद्रावरून पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तुलसी सिड प्रा.लि.या कंपनीचे TBH हायब्रीड बाजरा 405 या बाजरा हे वान घेतले होते वान घेते वेळी शेतकऱ्यांना प्रती बँग 22 क्विंटल उत्पन्न येते असे सांगण्यात आले होते पण वस्तुस्थिती पाहता 1 क्विंटल पण येणार नाही अशी परिस्थिती आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या कडे अर्ज दाखल केले असून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती केली आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारोळा येथील सागर ट्रेडर्स अमळनेर नाका या कृषी केंद्रातून तुळशी 405 या वानाची तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी करून लावणी,पेरणी केलेली असून सदर वानाची बाजरी कनसांना दाणे आलेच नाही तर काही ठिकाणी निमित्येला दाणे आढळून येत आहेत त्यात सदर कंपनीकडून एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे समजते किंवा बोगस बियाणे दिले असावे संदर्भात शेतकरींनी संबंधित कृषी केंद्र चालका गेल्या एक महिन्यापासून संपर्क करत असून कृषी केंद्र चालकाला ही तुलसी कंपनीचे अधिकारी टोलवा टोलवी करताना दिसत लक्षात आले आहे.
हेही वाचा : …पण मला जिवंत ठेव दादा; स्वारगेट अत्याचार प्रकरणात पीडितेचा पोलिसांत जबाब
सदर वनाची माहिती देताना प्रतिबॅक 22 क्विंटल उत्पन्न येणार असे सांगण्यात आले होते पण वस्तुस्थिती पाहता प्रती बँग एक क्विंटल पण उत्पन्न येणार नाही त्यामुळे शेतकरीनी आमच्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेकडे तक्रारी अर्ज दिनांक २५ फेब्रुवारी 2025 रोजी दिलेला असून शेतकऱ्यांनी या पिकावर खूपच खर्च केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे तरी शेतकऱ्यांना तात्काळ न्याय मिळावा अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेने केलेली आहे.
यात मोढाळे पिंपरी येथील राजेंद्र माधवराव पाटील ,सांगवी येथील अनिल यादव पाटील ,धर्मेंद्र आत्माराम पाटील, महेंद्र शालिकराम पाटील, सारवे येथील इब्राहिम नगिन खाटीक,खेडीढोक येथील कल्याण सिंग युवराज पाटील, पारोळा येथील मोतीलाल काळु भोई,अशोक हरी महाजन,सांगवी येथील दत्तात्रय श्रीराम पाटील, शेवगे येथील गंजीधर शंकर पाटील,देविदास यशवंत पाटील,राजेंद्र भिमराव पाटील,दळवेल येथील सुरेश पितांबर पाटील या शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे
पंचायत समिती पारोळा येथील शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले असून निवेदन बी बी बोरसे – कृषि अधिकारी,संदीप पाटील – कृषि विस्तार अधिकारी,डी एन मोरे – कृषि विस्तार अधिकारी पंचायत समिती पारोळा यांनी स्विकारले या संदर्भात मोक्का तपासणी करून पंचनामा केला जाणार व संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असे आश्वासन दिले यावेळी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“जर का तालुक्यातील, जिल्ह्यातील,राज्यातील कोणत्याही बी बियाणे संदर्भात किंवा कोणत्याही रासायनिक खते,फवारणी ची औषधी संदर्भात शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर महाराष्ट्र शेतकरी संघटना शांत बसणार नाही अशा वेळेस शेतकऱ्यांनी तात्काळ संघटनेकडे अर्ज करावा सोबतच कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडेही अर्ज करावा” असे आवाहन शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केले आहे.