---Advertisement---

PM Modi : पंतप्रधान मोदींचा ‘श्रीलंका मित्र विभूषण’ पुरस्काराने सन्मान

by team
---Advertisement---

PM Modi Sri Lanka Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय श्रीलंका दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी (४ एप्रिल) संध्याकाळी पंतप्रधान मोदी कोलंबो येथे पोहोचले. श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्री विजिता हेरथ, आरोग्य मंत्री नलिंडा जयतिस्सा आणि मत्स्यव्यवसाय मंत्री रामलिंगम चंद्रशेखर यांच्यासह पाच उच्चपदस्थ मंत्री त्यांचे विशेष स्वागत करण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींचे राजकीय सन्मानाने स्वागत करण्यात आले. स्वातंत्र्य चौकात त्यांना गार्ड ऑफ ऑनर आणि २१ तोफांची सलामी देण्यात आली. श्रीलंकेच्या त्यांच्या दौऱ्याचा हा चौथा प्रसंग होता.

या दरम्यान पंतप्रधान मोदींना श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘श्रीलंक मित्र विभूषण’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांना श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी कोलंबो येथे प्रदान केला.

यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात श्रीलंका आणि भारत यांच्यातील संबंधांवर चर्चा केली. यासोबतच पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा सन्मान देशातील १४० कोटी भारतीयांचा आहे. पंतप्रधान मोदी श्रीलंकेच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी भारत आणि श्रीलंका यांच्यात संरक्षण आणि पायाभूत सुविधांसह अनेक करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

मित्र विभूषण पुरस्कार हा श्रीलंका सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, जो परदेशी मान्यवरांना दिला जातो. ज्यांनी श्रीलंकेशी विशेष मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सेरेमोनियल गार्ड ऑफ ऑनर नंतर मित्र विभूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले परदेशी नेते आहेत.

१०,००० कोटी रुपयांचे प्रकल्प

भारत आणि श्रीलंकेमध्ये केवळ राजनैतिक संबंधच नाही तर भू-विकास प्रकल्पही सुरू आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की भारत श्रीलंकेच्या शेतकऱ्यांना थेट मदत करेल. त्यांनी भारतीय वंशाच्या तमिळ (IOT) समुदायासाठी १०,००० कोटी रुपयांच्या गृहनिर्माण आणि सामाजिक योजनांची घोषणा केली. याशिवाय, त्यांनी श्रीलंका सरकारसोबत नवीन करार केले, ज्यात पायाभूत सुविधा, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि हरित ऊर्जा यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment