नवापूर : गेल्या अनेक वर्षापासून येथील आई सप्तशृंगी प्रतिष्ठान पदयात्रा सेवा समितीतर्फे सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पद यात्रेचे आयोजन करण्यात येत असते. साडेतीन शक्ती पीठापैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या आणि लाखो भक्तांचे कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीच्या चैत्र यात्रोत्सवाला जाण्यासाठी शहरातील विविध भागातून भाविक भक्तगण सप्तशृंगी देवीच्या गडाकडे वाजत गाजत पदयात्रेने जात असतात. परंपरे नुसार मातेचे भक्त विक्रम दुबळा यांच्या हस्ते शहरातील सप्तशृंगी मातेच्या मंदिरावर दुपारी ध्वज चढविण्यात आला.
शहरातून गेल्या अनेक वर्षांपूर्वी ज्यांनी पदयात्रा सुरू केली ते मातेचे भक्त भटू उखा पवार,शंकर दर्जी,अंबादास आतारकर आदींची आई सप्तशृंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावीत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पदयात्रेतील भाविकांना गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देणारे बडोद्याचे जिग्नेश जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी साधनसामुग्री रथाचे पूजन भरत गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी सोन्या मारुती विश्वस्त मंडळातर्फे भरत गावीत यांचा सत्कार करण्यता आला. मातेच्या जयघोष करीत भक्ती गीतांच्या मधुर तालावर भाविक चरणमाळ, बोपखेल मार्गे भाविकांच्या पहिला जत्था रवाना झाला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, वतन अग्रवाल,शिवसेना उपजिल्हाप्रमुख हसमुख पाटील, बाजार समितीचे संचालक भालचंद्र गावित,माजी नगरसेवक अजय पाटील,विजय सैन,विशाल सांगळे,महेन्द्र जाधव,रामकृष्ण पाटील,किरण टीभे,राहुल मराठे,अनिल सोनार,धर्मेश परदेशी,दर्शन पाटील,श्याम गावीत,प्रेमेंद्र पाटील,विजय तीजबीज,सुनील पवार,दर्शन ढोले,संदीप पाटील,दर्पण पाटिल आदि उपस्थित होते.यावेळी भरत गावीत यांनी गेल्या अनेक वर्षापासून सुरू झालेल्या पद यात्रेची विस्तृत माहिती व प्रस्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी केले. सूत्रसंचालन जितेंद्र अहिरे तर आभार रज्जु अग्रवाल यांनी मानले. यात्रेकरु मातेच्या जयघोष करीत चरणमाळ, बोफखेल मार्गे रवाना झाले .बोपखेल येथे श्रीराम नवमीनिमित्त-प्रतिष्ठाण च्या पदाधिकार्यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन महाआरती करून महाप्रसाद वाटप केले.
यावेळी सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या .पदयात्रेत भाविकांना कुठलीही अडचण येवू नये म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव ,उपाध्यक्ष रज्जू अग्रवाल सचिव शैलेश सैन, संघटक प्रशांत पाटील,जिग्नेश जाधव आदींनी भाविकांच्या सेवेसाठी भोजन, शुद्ध पाणी ,औषध सरबत , नाश्त्यासह विविध साधनसामग्रीचे नियोजन केले आहे.नवापूर ते वणी गड आड मार्गाने १५० किलोमीटर अंतर भाविक पायवाटेने गाठून गडावर मातेच्या दर्शनासाठी पोहचतात.यंदा उन्हाचा तडाका असला तरी भाविकांमध्ये उत्साह कायम असल्याचे दिसून आला.आई सप्तशृंगी प्रतिष्ठान पद यात्रा सेवा समितीतर्फे खास सोई सुविधा केल्याने पायी चालण्याचा प्रवास थोडा सुखकर झाल्याने पदयात्री भाविकांनी समाधान व्यक्त केले