---Advertisement---
राज्यांत गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. यात चोरीच्या घटना देखील वाढल्या आहेत. असाच एक चोरीची घटना उघड झाली आहे. ही चोरी करतांना चोरट्यांनी अजबच शक्कल लढवली आहे. चोरी करण्याची पद्धत पाहता पोलीस देखील आश्चर्य चकित झाले आहेत. ही चोरीची घटना शुक्रवारी (६ जून) नागपूर येथील बिअर शॉपच्या काउंटरमधील २५ हजारांची रोकड लंपास केली आहे. चोराने बिअर शॉपच्या काउंटरवरील ग्रिल न कापता आत जाऊन चोरी केली.
याप्रकरणी अज्ञात विरोधात वाठोडा पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. हे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हे दृश्य पाहून सर्वांचे डोळे पाणावले. चोराने पैशासाठी लढविलेली शक्कल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती दुकानात दारूच्या बाटल्या विकणाऱ्या खिडकीतून आत जातांना दिसत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव शेख राजा शेख बाबा आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेला तरुण प्रथम दुकानाची तपासणी करतो. या तरुणाने काळा पोशाख परिधान केला आहे. हा तरुण दुकानाची बारकाईने तपासणी करतो. थोड्या वेळाने तो पुन्हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. तो खालून थेट काउंटरवर उडी मारून एका अरुंद जागेतून बिअर शॉपमध्ये शिरला. जिथे ग्राहक दारूचे पैसे देतात आणि बाटल्या घेतात अशा काउंटरवरच्या जागेतून आत शिरला. यावेळी त्याने आपले रबरी शरीर वाकवून आत प्रवेश केला. काउंटर बॉक्समधून पैसे चोरल्यानंतर तो त्याच अरुंद जागेतून बाहेर पडला.
पोलिसांच्या तपासात असे आढळून आले की, वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामश्री बिअर बारमध्ये शेख राजा शेख बाबा (२०) नावाच्या चोराने चोरी केली होती. पाळत ठेवणाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी त्याला गाठले आणि त्याला अटक केली. अखेर त्याने चोरीची कबुली दिली, परंतु तपासात असेही आढळून आले की त्याने अमरावती येथून काही दुचाकी देखील चोरल्या होत्या. नागपूर पोलिसांच्या क्राइम युनिट-४ च्या पथकाने त्याला अटक केली.
वाठोडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक हरीश बोराडे म्हणाले की, ही चोरीची घटना ६ जून रोजी रात्री उशिरा घडली. बिअर शॉपमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने आम्ही १३ जून रोजी आरोपीला पकडले. आरोपी शेख राजा शेख बाबा हा मूळचा अमरावतीचा आहे. तो काही दिवसांपूर्वी त्याच्या कुटुंबासह नागपूरला आला होता. हा चोर अरुंद ठिकाणी घुसून चोरी करण्यात तज्ज्ञ आहे. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर तो शहरात चर्चेचा विषय बनला आहे.