---Advertisement---
जळगाव : घरी उशिरा आल्याने वडील रागावले आणि किरकोळ मारहाण केली. या रागातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवली. ही घटना खेडी हुडको परिसर घडली असून, प्रज्ञा रवींद्र शिंदे (१६) असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जळगाव शहरापासून जवळच असलेल्या हुडको परिसरात रवींद्र शिंदे वास्तव्याला असून, ते सेंटिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना पत्नी, तीन मुली आणि दोन मुले, असा परिवार आहे.
बुधवारी (१८ जून) रोजी सकाळी मुलगी प्रज्ञा ही कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली. रात्री उशिरा ती घरी परतल्यानंतर वडिल रवींद्र शिंदे रागावले आणि किरकोळ मारहाण केली. या रागातून प्रज्ञाने घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
---Advertisement---
गुरुवारी ( १९ जून) रोजी दुपारी १२ वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच प्रज्ञाचे नातेवाईक, शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कविता कमलाकर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने प्रज्ञाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
आई-वडिलांचा आक्रोश
मुलीचा मृतदेह पाहताच प्रज्ञाच्या आई-वडिलांनी एकच आक्रोश केला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
---Advertisement---