---Advertisement---

Ahmedabad Plane Crash : अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स निकामी, डेटा मिळवण्यासाठी अमेरिकेच्या प्रयोगशाळेत पाठविणार

---Advertisement---

Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाच्या एआय-१७१ या बोईंग ७८७-८ ड्रीमलाईनर विमानाचा १२ जून रोजी अहमदाबादमधील मेघानीनगर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेनंतर आता तपासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ब्लॅक बॉक्स बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर २८ तासांनी ब्लॅक बॉक्स सापडला.

सध्या यंत्रणेने प्राथमिक तपास सुरु केला असला तरी ब्लॅक बॉक्सला नुकसान झाल्यामुळे त्यातील डेटा बाहेर काढणे कठीण जात आहे. त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेतील नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड, वॉशिंग्टन येथे पाठवला जाऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

जर ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला गेला, तर भारतीय अधिकाऱ्यांची एक टीमही त्याच्यासोबत जाईल, जेणेकरून सर्व प्रोटोकॉलचे पालन सुनिश्चित करता येईल. सीव्हीआरमार्फत पायलट्समधील शेवटचे संभाषण, चेतावण्या, अलार्म्स आणि इतर ध्वनी तपासले जातील.

कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांच्यातील संवाद, त्यांच्या प्रतिक्रिया आणि अलार्मला दिलेले प्रतिसाद यांची नोंद असण्याची शक्यता आहे. एफडीआर वापरून फ्लाइटचा सविस्तर प्रवास, वेग, उंची, तांत्रिक प्रतिक्रिया आणि इतर डेटा सादर केला जाईल. लंडनच्या गॅटविक विमानतळाच्या दिशेने निघालेल्या या विमानात २४२ प्रवासी होते. या दुर्घटनेत एकूण २७४ मृत्यू झाले आहेत. मात्र, अपघातात फक्त एकच प्रवासी बचावला.

काय आहे ब्लॅक बॉक्स ?

ब्लॅक बॉक्स हा प्रत्यक्षात दोन यंत्रांचा समूह असतो कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (सीव्हीआर) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर).
सीव्हीआर : पायलट्समधील संभाषण, कॉकपिटमधील इतर ध्वनी, एटीसीसोबतचे संवाद, तसेच यंत्रणांचे अलार्म्स इत्यादी २ तासांपर्यंत रेकॉर्ड करतो (एआय-१७१ विमान २०१४ मध्ये तयार झाले असल्याने त्यात २५ तासांची क्षमता नसल्याचे सांगितले जात आहे).
एफडीआर : उंची, वेग, दिशा, थ्रस्ट, विंग कंट्रोल, विमानाच्या हालचाली अशा हजारो तांत्रिक बाबींची माहिती रेकॉर्ड करतो.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---