---Advertisement---

धक्कादायक ! महिलेचा खून करून मृतदेह गोणीत भरून फेकला, पारोळा तालुक्यातील घटना

---Advertisement---

जळगाव : डोक्यात दगड टाकून एका ४५ वर्षीय महिलेचा खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पारोळाच्या सुमठाणे शिवारात बुधवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात असलेल्या सामाजिक वनीकरणाच्या जंगलामध्ये सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास इंधवे (ता. पारोळा) येथील काही तरुण बकऱ्या चारून घरी परत येत होते. त्यावेळी त्यांना एका महिलेचा खून करून मृतदेह गोणीत टाकून तिला फेकून दिल्याचे आढळून आले. तसेच तिचे हातपाय बांधलेले अवस्थेत होते. ही घटना दोन दिवसाआधी घडली असावी, असा अंदाज आहे.

---Advertisement---

हा परिसर अमळनेर व पारोळा तालुक्याला लागून असल्याने घटनास्थळी आधी अमळनेर पोलिस पोहोचले. त्यानंतर ही घटना पारोळा तालुक्याच्या हद्दीत असल्याची खात्री झाली. रात्री दहा वाजल्यानंतर पारोळा येथील पोलिस उपनिरीक्षक अमरदीप गोसावी, पोलिस कॉन्स्टेबल अभिजित पाटील, सुनील हटकर यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले. या महिलेची रात्री उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---