---Advertisement---
जळगाव : अमळनेरातील गांधलीपुरा भागात अमळनेर पोलिसांनी कारवाई करत देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक केली आहे. पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्या फिर्यादीवरून पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांधलीपुरा परिसरात देहविक्री व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वात खासगी वाहनातून येऊन छापा टाकण्यात आला. वेगवेगळ्या घरांमध्ये चालणारा वेश्याव्यवसाय उघड झाला.
डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन ही कारवाई पार पडली. यामध्ये पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, नामदेव बोरकर, समाधान गायकवाड, महिला होमगार्ड व इतर पोलिस अधिकारी सहभागी होते. यावेळी याठिकाणी काही ग्राहकही होते.
चाळीसगाव, भडगाव, एरंडोल येथूनही ग्राहक
या कारवाईत ग्राहक म्हणून उपस्थित असलेल्या शाहरुख शेख असलम (३०, खडकपूरा, पाळधी), समाधान मांगलू पाटील (३२, शिरसमणी), उदय दिलीप शितोळे (४०, भडगाव), निखील बापू बच्छाव (१९, पिंप्री), बस्तीलाल गोविंदा पाटील (३३, खडके खु., एरंडोल), जावेद शेख सत्तार (४२, गांधलीपुरा), नामदेव वामनराव बडगुजर (७८, चाळीसगाव) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली.