---Advertisement---

भारत-अमेरिका व्यापार करारावर सहमती नाहीच, शुल्काचा पेच कायम

---Advertisement---

शुल्काच्या मुद्यावर भारत अमेरिकेत एकमत न झाल्याने भारत अमेरिका व्यापार करारावर सहमती – होऊ शकली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी दोन्ही देशांमध्ये व्यापार करारावर सहमती झाली असून ८ जुलै रोजी याबाबत घोषणा केली जाऊ शकते, असे वृत्त समोर आले होते.

१० टक्के शुल्क कायम ठेवावे अशी अमेरिकेची इच्छा आहे, तर कित्येक क्षेत्रातील १० टक्के शुल्क शून्यावर आणले जावे, अशी भूमिका
भारताने घेतली असत्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही देशांमधील चर्चेत तोडगा न निघाल्याने राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वात वाटाघाटींसाठी गेलेल्या पथकाचा दौरा वाढला आहे.

व्यापार करारावर भारत आणि अमेरिकेत सहमती झाली आहे आणि याबाबतची घोषणा ८ जुलै रोजी केली जाऊ शकते, असे वृत्त यापूर्वी आले होते. त्यानंतर व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लॅव्हिट यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांचा हवाला देत, दोन्ही देशांमधील बळकट संबंध कायम राहतील, असे म्हटले होते.

भारत-अमेरिका व्यापार कराराच्या जवळ आहे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प याबाबत लवकरच माहिती देतील, असे लॅव्हिट यांनी सांगितले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत तसेच ते क्वाडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी २ जुलै रोजी जगभरातील कित्येक देशांवर जशास तसा कर लागू केला होता. मात्र, त्यावर गोंधळ उडाल्याने अमेरिकेने कित्येक देशांना तात्पुरता दिलासा दिला. भारतावर लादलेले २६ टक्के शुल्क ९ जुलैपर्यंत स्थगित केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---