---Advertisement---
आपल्या हातांची पकड ही आरोग्याचा आरसा असते. वस्तू पकडण्याच्या शक्तीवरून आरोग्य आणि वयाचा अंदाज लावता येतो. हातांची कमकुवत पकड असणाऱ्यांना हृदयरोगस लकवा आणि मधुमेहासारखे रोग होऊ शकतात, असे एका संशोधनानुसार समोर आले आहे.
ज्या लोकांची पकड कमकुवत होती, त्यांच्यात हृदयविकार आणि पक्षाघाताचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याचे वे आढळून आले.
यासोबतच लठ्ठपणा आणि स्मृती कमकुवत होण्यासारख्या समस्यांशीही आढळून आल्या, असे द लॅसेटद्वारे करण्यात आलेल्या संशोधनात १७ देशांमध्ये १.४ लाख लोकांवर केलेल्या अभ्यासात आढळले. याचे कारण म्हणजे बऱ्याचदा पकड चाचणी रुग्णाच्या आरोग्याचे त्वरित आकलन करण्यासाठी वापरली जाते.
शरीराची एकूण ताकद, मांसपेशी, नसांचा ताळमेळ आणि हृदयाची क्षमता कशी आहे, हे लक्षात येते. पन्नाशीनंतर अनेक रुग्णांची पकड कमकुवत होते. असे लोक लवकर थकतात. लहान आजारातून सावरण्यासाठी वेळ लागतो आणि शरीरात फॅट जास्त होते. ज्यांची पकड बळकट असते, त्यांचा फिटनेस चांगला असतो आणि ते लवकर बरे होतात.
पन्नाशीनंतर मांसपेशी व नसांची ताकद कमी होते. मात्र, सक्रिय राहणे आणि हातांशी संबंधित काम करत राहिल्यास ही प्रक्रिया मंद होऊ शकते, असे दिल्लीचे जनरल फिजिशन डॉ. रामितसिंह संब्याल यांनी सांगितले. पकड ही अनेक प्रकारची असते. उदा. क्रश ग्रिप म्हणजे हस्तांदोलन, डंबल पकडणे, पिंच ग्रिप म्हणजे चावी फिरवणे किंवा प्लेट उचलणे आणि सपोर्ट ग्रिप म्हणजे शॉपिंग बॅग उचलणे.
अशी ओळखा तुमची पकड
टेनिस बॉल जोरात दाबा व पाहा किती वेळ पकडू शकता. घट्ट झाकणाची बाटली उघडणे, कपडे पिळणे किंवा केटली उलटणे जड गेले तर हे कमकुवत ग्रिपचे संकेत आहेत. डेड हँग म्हणजे एखाद्या पोलवर लटकण्याचा प्रयत्न करा. ३० सेकंद टिकल्यास ग्रिपवर काम करणे गरजेचे आहे. असा निष्कर्ष निघतो.