---Advertisement---

Jalgaon News : पिंप्राळ्यात आज गुंजणार पांडुरंगाच्या नामाचा गजर

---Advertisement---

जळगाव : पिंप्राळा येथे आषाढी एकादशीला श्री विठ्ठल मंदिर संस्थान, पिंप्राळा वाणी पंच मंडळ व ग्रामस्थ मंडळातर्फे श्री पांडुरंग रथोत्सवाचे रविवारी (दि. ६) रोजी दुपारी साडेबारा वाजेपासून सुरुवात होणार आहे. तर रथोत्सवात पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पिंप्राळ्यात उसळणार आहे.

आषाढी एकादशीला दि. ६ रोजी साडे अकरा वाजता रथाची महापूजा, दुपारी साडेबारा वाजता रथयात्रेला शुभारंभ जुने ग्रामपंचायत कार्यालय येथून होईल. त्यापूर्वी पहाटे पाच वाजता विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रुख्माईचा दुग्धाभिषेक, आरती, सकाळी सात वाजता वाणी समाजातर्फे अभिषेक होईल. दरवर्षी रथाला अडथळा ठरणाऱ्या वाहिन्यांमुळे होणारा वीजपुरवठा खंडित होत असे. यंदा मात्र विद्युतपुरवठा अखंडित राहण्यासाठी महावितरणकडून रथाच्या मार्गावर ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली असल्याची माहिती हुडको उपकेंद्राचे उपअभियंता मोहन भोई यांनी दिली.

रथोत्सवात यंदा रथाच्या मार्गावर विशेष सजावट करण्यात आलेली आहे. रथ मार्गावर रांगोळ्या तयार केल्या असून, दोन मोठ्या कमानी रथाच्या स्वागतासाठी उभारण्यात आल्या आहे. रथावर फुलांची उधळण तसेच लाइट-शो व फटाक्यांची आतषबाजी भाविकांना पहावयास मिळणार आहे. श्री विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे या वर्षी रथोत्सवात ५०० किलो पंजिरीचा प्रसाद भाविकांना रथोत्सवात वाटप केला जाणार आहे.

असा आहे रथाचा मार्ग

सकाळी साडे अकरा वाजता मंदिराजवळ महापूजा, साडेबारा वाजता महाआरती, त्यानंतर रथ चौक, भोईवाडा, कोळीवाडा, भिलवाडा, मढी चौक, धनगरवाडा, महाराणा प्रताप चौक, सोमाणी मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, केशरीनंद हनुमान मंदिर रात्री १० वाजता रथ मूळ स्थानी येईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---