---Advertisement---

हिवरखेडा तांड्याच्या रेशन दुकानदाराकडून काळाबाजार, ग्रामस्थांनी रंगेहात पकडला एक क्विंटल तांदूळ

---Advertisement---

पारोळा तालुक्यातील हिरखेडा तांडा येथील रेशनदुकानदाराची दादागिरी वाढतच असून रविवारी एक क्विंटल तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी नेतांना भानुदास ओंकार पवार व ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडला. यासंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी संपर्क साधत या प्रकाराबाबत तक्रार केली.

याबाबत माहिती अशी की, वसंत पौलाद पवार यांचे हिवरखेडा तांडा येथे दुकान क्र. ६१ स्वस्त धान्य दुकान आहे. लाभार्थ्यांना शासकीय योजनेनुसार धान्य उपलब्ध करून देणे अनिवार्य असतांनाही रेशनदुकानदार वसंत पवार हे लाभार्थ्यांकडून ५० रूपये प्रतिशिधापत्रिका घेत असत्याच्या तक्रारी आहेत. तसेच याबाबत कुणी विचारणा केल्यास ‘तुम्हाला कुणाकडे जायचे जा, तक्रार केली तर तुमच्यावरच गुन्हा दाखल करेल’ अशी धमकी देतात.

तक्रारींमुळे वसंत पवार यांचे दुकानाचा परवाना दोन वेळा निलंबित झाला होता. मात्र पैशांच्या जोरावर परवाना परत मिळविला.
तसेच दोन दिवसात जे येतील त्यांनाच धान्य मिळेल अशी दवंडी रेशनदुकानदाराकडून दिली जात असल्याच्या तक्रारी आहे. रविवारी सकाळी ११.३० वा. दुचाकी क्र. एमच-१९-५४८३ आणि एमएच -१९- २७१५ या दोन दुचाकीवरून एक क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात विकणेसाठी घेऊन जात असतांना भानुदास ओंकार पवार यांनी व ग्राम स्थांनी रंगेहाथ पकडले.

जिल्हाध्यक्ष डॉ. चौधरींचा जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क

या प्रकाराबाबत भाजपाचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी थेट जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे पुरवठा निरीक्षक निरगुडे यांनी घटनास्थळी येत काळ्याबाजारात जाणाऱ्या तांदुळाचा पंचनामा केला. तसेच संबंधित दुकानदाराचा परवाना निलंबित करून कारवाई करावी अशी मागणी देखिल यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---