---Advertisement---

ढगाळ वातावरण, मका पिकावर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांतर्फे आवाहन

---Advertisement---

जळगाव : अमळनेर तालुक्यात मका पिकावर खरीप हंगामातील पेरणी ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर झाली आहे. मका, बाजरी, ज्वारी, कापूस, सोयाबीन, उडीद, मूग पिके बहरात आली आहेत. मात्र, काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर विविध रोग आणि किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.

कृषी अधिकाऱ्यांतर्फे आवाहन

यंदा अपूर्ण पावसाअभावी व ढगाळ वातावरण यामुळे खरीप पिकांवर विविध रोगराई पसरली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना समस्या आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले आहे.

याचदरम्यान, मका पिकावर लष्करी अळीचे संकट आले आहे. त्याचा प्रादुर्भाव मका या पिकावर होत आहे. तालुक्यात हंगामात मका हे प्रमुख पीक आहे. विविध किडींचा मका पिकावर प्रादुर्भाव झाल्याने रासायनिक पध्दतीनेही फवारणी करता येते.

थायमेथोड्याम १२.६ टक्के सी.जी. व लॅबडा सायहॅलोथ्रीन २.५ टक्के झेड. सी. २.५ मिली किंवा स्पिनोटोरॅम ११.७ टक्के एससी ५ मिली किंवा क्लोरोनट्रॅनीलप्रोल १८.५ टक्के एससी ४ मिली. या कीटकनाशकांची आलटून पालटून गरजेप्रमाणे १५ दिवसाचे अंतराने फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---