---Advertisement---

घर वापसी : तमन्नाने सनातन धर्म स्विकारत मंदिरारात केले लग्न

---Advertisement---

आझमगड : उत्तर प्रदेशातील एका गावात एक मुस्लिम तरुणी व एक हिंदू तरुण यांच्यात मागील दहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. या दोघांनी घरातून पळून जात कोर्ट मॅरेज केले. यामुळे त्यांच्या दोघांच्या कुटुंबांमध्ये सतत वाद उफाळून येत होते. या वादाला कंटाळून तरुणीने हिंदू (सनातन ) धर्मात प्रवेश केला. या तरुणीचे नाव तमन्ना होते तिने तिचे नाव बदलून तनू असे ठेवले. हिंदू तरुणाचे नाव चंदन मौर्य आहे. या दोघांनी शिव मंदिरात हिंदू रितीरिवाजानुसार विवाह केला.

काय आहे प्रकरण ?

मागील दहा वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असलेल्या तमन्ना व चंदन हे दोघे ३० मे रोजी घरातून पळून गेले होते. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. त्यांनी त्यांची मुलगी पळून गेल्याची तक्रार दाखल केली होती. हे दोघे भिन्न भिन्न धर्मातील असल्याने पोलिसांनी तपासास गती देत या प्रेमी युगलाला एक जुलै रोजी आपल्या ताब्यात घेतले. यावेळी या दोघांनी त्यांच्या कोर्ट मॅरेजची कागदपत्रे पोलिसांनी दाखवली. यावेळी दोन्ही सज्ञान असल्याने पोलिसांनी दोन्हींच्या कुटुंबियांना कायदा व सुववस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले.

पोलिसांनी कुटुंबाला सांगितले की दोघेही सज्ञान आहेत. दोघांनीही कोर्टात लग्न केले आहे. तमन्ना हिने स्वतःच्या इच्छेने हिंदू धर्म स्वीकारला. त्यांचा विवाह हिंदू रितीरिवाजानुसार शिव मंदिरात लावलण्यात आले. दरगंज पोलिस स्टेशनचे अधिकारी राकेश कुमार सिंह म्हणतात की , दोन्ही कुटुंबे एकाच गावांतील आहेत. या लग्नाने दोघांमध्ये वाद झाला. दोन्ही कुटुंबांमध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. या जोडप्याला कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून, दोन्ही कुटुंबांना पोलिसांनी निर्बंध लादले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---