---Advertisement---

मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप ; मद्यधुंध अवस्थेत तरुणीला…

---Advertisement---

मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे ही पुन्हा एकदा तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ती अभिनेत्री राखी सावंतची खास मैत्रीण असून ती एका घटनेमुळे चर्चेत आली आहे. अंधेरी परिसरात रविवारी रात्री राजश्रीच्या गाडीचा अपघात झाला होता. हा अपघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख याने केल्याचा आरोप तिने केला असून कारवाईची मागणी केली आहे.

अपघात झाला त्यावेळी राहील हा मद्यपान करुन गाडी चालवीत असल्याने झाला असल्याचे तिने म्हटले आहे. यासंदर्भाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओत राहील तिला शिविगाळ करतांना दिसत आहे. तो अर्धनग्न अवस्थेत आक्रमकपणे तिला धमकी देताना दिसून येत आहे. यावेळी तो तिला “xxx पैसे घे. जा आणि पोलिसांना सांग.. मी जावेद शेखचा मुलगा आहे. मग काय होईल ते तुला दिसेल”, अशी धमकी त्याने राजश्रीला दिली.

---Advertisement---

राहील हा संबंधित व्हिडीओमध्ये घटनास्थळी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशीही उद्धटपणे बोलून वाद घालतांना दिसून येत आहे. पोलीस त्याला सहकार्य करण्याचे आवाहन करत असतांना तो सहकार्य करण्यास नकार देत पोलिसांशी देखील आक्रमणपणे वागतांना दिसत आहे. या घटनेनंतर राजश्रीने राहील विरोधात एफआयआर दाखल केला आहे. सोशल मीडियावर तिने या एफआयरची कॉपी शेअर करीत राहील मद्यपान करुन गाडी चालवीत होता. यावेळी तो त्याच्या वडिलांच्या राजकीय संबंधांवरुन धमकावित असल्याचे म्हंटले आहे. यासोबतच एफआयआर दाखल झाल्यानंतर मनसे कार्यकर्ते तिला धमकावीत आहेत.

राजश्रीने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. तिच्या पोस्टचे सर्वत्र कौतुक आहेत. महाराष्ट्रात मराठी भाषेत बोललं पाहिजे, या मनसेच्या आग्रहावर तिने संताप व्यक्त केला होता. इतरांवर भाषा लादण्यापेक्षा स्थानिकांनी अधिक मेहनत करावी, असं तिने म्हटलं होतं. स्थलांतरितांशिवाय मुंबईतील स्थानिक मराठी लोकांची स्थिती आणखी बिकट होईल, असा दावाही तिने केला. तिच्या या वादग्रस्त विधानानंतर, वर्सोवा इथल्या मनसे कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर राजश्रीने जाहीर माफी मागितली आणि तिच्या सोशल मीडिया हँडलवरून तो व्हिडीओ काढून टाकला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---