---Advertisement---

‘त्या’ घटनेत पत्नीचं निघाली पतीची मारेकरी, शवविच्छेदन अहवालाने फोडले बिंग

---Advertisement---

नागपूर : येथील वाठोडा येथे एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. येथे एका महिलेने प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची ठार मारले. तपासात प्रथम तिच्या पतीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे मानले गेले होत. मात्र, शवविच्छेदन अहवालात खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मयताचे नाव चंद्रसेन रामटेके असून तो त्याची पत्नी दिशा रामटेके सोबत राहत होता.

चंद्रसेन रामटेके यांना अर्धांगवायू झाला असल्याने ते घरीच असत. त्यांची पत्नी दिशा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पाण्याचे कॅन भरुन पाणी विकण्याचा व्यवसाय करायची. दिशा ही काही महिन्यांपूर्वी आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ ​​राजाबाबू टायरेवाला यांची भेट झाली होती. आसिफ अन्सारी हा मेकॅनिकचे काम करायचा. तो दुचाकी दुरुस्ती आणि पंक्चर काढण्याचे काम करीत होता. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली, यानंतर त्यांची जवळीक वाढत जाऊन त्यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले.

---Advertisement---

शुक्रवारी चंद्रसेन हा घरी झोपला होता. यावेळी दिशाने तिचा प्रियकर आसिफला घरी बोलवून घेतले. चंद्रसेन झोपेत असतांना दिशाने आशिफच्या साहाय्याने त्याच्या चेहऱ्यावर उशी ठेवत त्याचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर चंद्रसेन याला घेऊन दिशा रुग्णलयात पोहचली. यावेळी तिने तिचा पती नैसर्गिकरित्या मरण पावला असल्याचा बनाव केला. मात्र, तिच्या पतीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाचा रिपोर्ट पाहून धक्कादायक सत्य बाहेर आले. मयताच्या मानेवर, नाकावर आणि तोंडावर दाबाच्या खुणा आढळून आल्या आहेत, ज्यामुळे त्याची हत्या झाल्याचे दिसून येते, असे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

पोस्टमार्टम रिपोर्ट पाहिल्यानंतर रुग्णालयातील ही बाब डॉक्टरांनी प्रथम व तात्काळ पोलिसांना सांगितली. पोलिसांनी लागलीच दिशाची चौकशी केली असता तिने प्रियकर आसिफ अन्सारीच्या मदतीने तिच्या पतीची खून केल्याचे कबूल केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---