---Advertisement---

Jalgaon News : दोन दिवसात पाच जणांची आत्महत्या, काय आहे कारण ?

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत पाच जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या आत्महत्येला नैराश्याची किनार असल्याचे समोर आले आहे.

कुसुंबा येथे सोमवारी सायंकाळी तरुणाने मृत्यूला कवटाळले. दुपारी रामेश्वर कॉलनीतील १७ विद्यार्थिनीने गळफास घेतला. मंगळवारी (जुलै) सकाळी ‘शिवाजीनगरातील लक्ष्मी नगरात तरुणाने, तर दुपारी फुपनगरी येथील तरुणाने गळफास घेतला. सायंकाळी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावत्या रेल्वेखाली एकाचा मृत्यू झाला. कुटुंबात कोणीच नसल्याची संधी हेरत एकुलत्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेत घरी दरवाजा उघडताच मातेवर एकुलत्या मुलाला गमावल्याचे वेदनादायी दुःख पाहण्याचा प्रसंग उद्भवला.

ही घटना शिवाजीनगरात कानळदा रोडवरील लक्ष्मीनगरात मंगळवारी (८ जुलै) सकाळी उघडकीस आली. सचिन ऊर्फ रामेश्वर लक्ष्मण भोई (वय २५, रा. लक्ष्मीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

---Advertisement---

मंगलाबाई आणि तिचा मुलगा सचिन ऊर्फ रामेश्वर हे या ठिकाणी वास्तव्य करतात. तरुण केळकर मार्केटमध्ये कापड दुकानात कामावर होता. आषाढीनिमित्त त्याची आई मंगलाबाई पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्या होत्या. त्यामुळे सचिन हा घरी एकटाच होता. दर्शन आटोपल्यानंतर मंगलाबाई सोमवारी परतीच्या प्रवासाला निघाल्या. मंगळवारी (८ जुलै) सकाळी त्या जळगाव येथे उतरुन घरी आल्या. त्यांनी दरवाजा उघडला असता मुलाने गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी हंबरडा फोडला.

शेजारील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेत बेशुध्दावस्थेतील सचिन याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. तपासणीअंती डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. रुग्णालयात कुटुंबियासह नातेवाईकांना भावना अनावर होऊन रडू कोसळले. सचिन हा होतकरू आणि कोणाच्याही मदतीला धावून जाण्याचा त्याचा स्वभाव असल्याने त्याचा मित्रपरिवार मोठा होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.रामेश्वर कॉलनी येथील खुशी चैत्राम जाधव (वय १७) हिने घरात कोणी नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली. खुशी हिचा भाऊ महाविद्यालयातून घरी परतला असता बहिणीने गळफास घेतल्याचे त्याला दिसले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

कुसुंबा येथे आत्महत्या

घरात कोणी नसल्याची संधी हेरत तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी (७ जुलै) सायंकाळी ही घटना समोर आली. विशाल परशुराम पाटील (वय ३७, रा. कुसुंबा) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना कळाल्यानंतर कुटुंबियांनी आक्रोश केला. गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार गफूर तडवी तपास करीत आहेत. फुपनगरी येथे मुकेश राजाराम सोनवणे (वय ४०) याने गळफास घेतला. त्याला अत्यवस्थ अवस्थेत दुपारी १२.१५ च्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मृत घोषित केले. मंगळवारी संध्याकाळी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वेखाली एकाचा मृत्यू झाला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---