---Advertisement---

नंदुरबार जिल्ह्यात गंभीर गुन्हे असलेल्या टोळीविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई

---Advertisement---

नंदुरबार : जिल्ह्यात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील इतिहासात प्रथमच सराईत गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कायद्याचा उद्देश संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर आणि त्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवणे असा असून, या कारवाईमुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्यास मदत होणार आहे.

मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या टोळीतील टोळीप्रमुख राज्या ऊर्फ नागेश ऊर्फ नाकक्षा दम ण्या वळवी (वय २७, रा. कात्री, ता. धडगाव, जि. नंदुरबार), उमेदसिंग ऊर्फ उमेद ऊर्फ उमदया गोविंदसिंग पाडवी (वय २७, रा. काठी पाटपाडा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) व टोळीतील इतर ५ साथीदारांवर जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांत, तसेच गुजरात राज्यातही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये घातक शस्त्रे जवळ बाळगून दहशत निर्माण करणे, दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, मारहाण करणे, धमकी देणे अशा प्रकारे संघटितपणे गुन्हेगारी करून संबंधित टोळी सतत त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने व टोळीची दहशत निर्माण व्हावी यासाठी वेळोवेळी आर्थिक फायद्यासाठी गंभीर प्रकारचे गुन्हे करीत असे. तसेच यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळवत त्याचा गैरफायदा उचलून प्रचलित कायद्याचा अनादर करीत गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवत होते.


त्याअन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी गुन्हेगार टोळीवर मोलगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात म ोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्यामार्फत नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मंजुरीसाठी पाठविला होता. प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंजुरी दिल्याने संबंधित गुन्हेगार टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली. शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---