---Advertisement---
बळजबरीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणे हा गुन्हा आहे. जबरदस्तीने धर्मांतरणासाठी अधिक कठोर कायदा करुन, कठोर करावाई केल्याजाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीचा अहवाल शासनास सादर झाला आहे.
या अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. याबाबत जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणाबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
सांगली जिल्ह्यातील सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात संबंधित धर्मगुरू अपील दाखल करून गुन्हा विलंबाने दाखल केल्याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येईल. पुणे जिल्ह्यातील धर्मांतरण प्रकरणांमध्ये विशेष चौकशी समितीचा अहवाल एक महिन्याच्या आत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाचा लाभ ज्या धर्मातील प्रवर्गात घेतला आहे, त्याच धर्मात असण्याबाबत निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन करून धर्मांतर करीत आरक्षणाचा लाभ घेत असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.