---Advertisement---

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारचे कठोर पाऊल ; ३ हजार लाऊडस्पिकर काढले

---Advertisement---

मुंबई : राज्यात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी राज्यातील ३ हजार ३६७ लाऊडस्पिकर काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती विधासभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुंबईतील पार्थस्थळावरुन १ हजार ६०८ लाऊडस्पिकर हटविण्याची कारवाई मुंबई पोलिसांनी केली आहे. यात १हजार १५० मशिदी, ४८ मंदिरे, १० चर्च, ४ गुरुद्वारा आणि इतर १४७ ठिकाणांचे लाउड्स्पिकरांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणत्याही धार्मिक किंवा सांप्रदायिक तणावाशिवाय हे यश साध्य झाले आहे. कुठेही तणावाचे वातावरण नव्हते.

---Advertisement---

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावले जाणार नाहीत. यासोबतच, अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय लाऊडस्पीकर पुन्हा बसवल्यास स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी यास जबाबदार असतील, असा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातील ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारचे हे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय प्रदूषणाविरुद्ध एक आवश्यक पाऊल आहे.

रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वाजवता येणार नाहीत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. हा कायदा सुमारे २० वर्षांपासून लागू आहे. काही खास सणांसाठी न्यायालयाने सूट दिली आहे. यामध्ये गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या ४ दिवसांसाठी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी आहे.

देवेंद्र फडणवीस विधानसभेत माहिती देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडे बोट दाखवत त्यांनी विचारले की दररोज सकाळी वाजणाऱ्या लाऊडस्पीकरचे काय करावे? या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ध्वनी प्रदूषणाबाबत कायदा करण्यात आला आहे, परंतु , विचारांच्या प्रदूषणाबाबत अद्याप कोणताही कायदा नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---