---Advertisement---
जळगाव : जळगाव-आसोदा रस्त्यावर अंदाजे तीन महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांकडून तपास सुरु आहे. दरम्यान, हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्माला आले असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
पोलीस सूत्रानुसार, वीटभट्टी व्यावसायिक अशोक कुंभार हे नेहमीप्रमाणे आसोदा रस्त्यावरील त्यांच्या वीटभट्टीवर गेले असता त्यांना स्त्री जातीचे नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळुन आले. ही माहिती त्यांनी आसोदा येथील पोलीस पाटील आनंदा बिऱ्हाडे यांना दिली.
त्यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन अर्भकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. या प्रकरणी वीटभट्टी व्यावसायिक अशोक कुंभार यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तालुका पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्माला आले असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
---Advertisement---
घराबाहेर पडलेली तरुणी बेपत्ता
जळगाव : मैत्रिणीकडे पुस्तक देऊन येते, असे सांगून घराबाहेर पडलेली सतरा वर्षीय तरुणी बेपत्ता झाली. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुलीस फुस लावून पळवून नेले, अशा तक्रारीनुसार शनिवारी (१२ जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी (११ जुलै) साडेसहा वाजेच्या सुमारास ही मुलगी घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली. शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात ही घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे हे तपास करीत आहेत.