---Advertisement---
YouTube या ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म त्यांच्या कमाई धोरणात सुधारित बदल केले आहेत. हे बदल १५ जुलै २०२५ पासून लागू होणार आहेत. या अपडेटनंतर, YouTube च्या कमाई धोरणाचे म्हणजेच YouTube पार्टनर प्रोग्राम (YPP) नियम पूर्वीपेक्षा अधिक कठीण होणार आहेत. या नवीन धोरणामुळे पुनरावृत्ती होणारे किंवा एआय-जनरेटेड कंटेंट अपलोड करणाऱ्यांच्या कमाईवर याचा थेट दुष्परिणाम होईल. १५ जुलै पासून, YouTube ने त्यांचे पार्टनर प्रोग्राम नियम अधिक कडक. करण्याचे धोरण आखले आहे. या नवीन नियमांनुसार, मोठ्या प्रमाणात उत्पादित, पुनरावृत्ती होणाऱ्या आणि अप्रमाणिक सामग्रीमधून मिळणारे जाहिरात उत्पन्न कमी केले जाणार आहे.
YouTube वर AI जनरेटेड आणि स्पॅम कंटेंटमध्ये मोठ्या प्रमाणांत वाढ झाली होती. हे थांबविण्यासाठी युट्युबने कठोर पावले उचलली आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, एका इमेज किंवा व्हिडिओला क्लिपला एआय व्हाईसओव्हर दिला जातो. अशा व्हिडिओंची गुणवत्ता त्या मानाने कमी असते. यामुळे खऱ्या, सर्जनशील आणि प्रामाणिक निर्मात्यांचे नुकसान होतांना दिसत आहे.
---Advertisement---
एआय आणि पुनरावृत्ती होणाऱ्या कंटेंटमुळे जाहिरातींचे उत्पन्न कमी होईल. प्रामाणिक आणि मूळ मजकुराला प्राधान्य देण्यात येईल. आता केवळ एक हजार सबस्क्राइबर्स आणि चार हजार तास वॉच टाइम किंवा ९० दिवसांत १ कोटी शॉर्ट्स व्ह्यूज असणे पुरेसे असणार नसून तुमचा मजकूर देखील प्रामाणिक आणि अद्वितीय असावा लागणार आहे.
YouTube ने म्हटले आहे की, “हे एक लहान पण महत्त्वाचे अपडेट आहे ज्याचा उद्देश मूळ आणि दर्जेदार सामग्रीचा प्रचार करणे आहे. आम्हाला YouTube असे व्यासपीठ राहावे असे वाटते जिथे सर्जनशीलता आणि कठोर परिश्रमांना मान्यता मिळेल.”