---Advertisement---
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी गावातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने २१ लाख रुपयांचा
अवैध दारू आणि बिअरचा साठा जप्त केला आहे.
मोलगी गावातील उखळीपाडा रोडवर ग्रामपंचायत कार्यालयासमोरील एका पक्क्या घरात अवैध मद्यसाठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. पथकाने याठिकाणी भेट देत तपासणी केली असता, गोवा राज्यात निर्मित आणि विक्रीसाठी ग्राह्य असलेली व्हिस्कीचे २४७ खोके समोर आले. या खोक्यांमध्ये ११ हजार ८५६ बाटल्या मिळून आल्या.
---Advertisement---
दरम्यान, याच घरात मध्य प्रदेश राज्यात निर्मित आणि तेथेच विक्रीसाठी ग्राह्य असलेले अवैध बिअरचे १३८ बॉक्सदेखील मिळून आले. या बॉक्समध्ये एकूण ३ हजार ३१२ टीन आढळून आले. एकूण २१ हजार ५९ हजार २८० रुपयांचा हा मुद्देमाल आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त पी. पी. सुर्वे, नाशिक विभागीय उपआयुक्त उषा शर्मा, नंदुरबार अधीक्षक स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनात दुय्यम निरीक्षक पी. व्ही. मोरे, एस. के. कानडे, एस. एस. गोवेकर, मोलगी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा, हेमंत पाटील, हितेश जेठे, संदीप वाघ, ऋषिकेश सोनवणे, शुभम पवार, पोलिस कॉन्स्टेबल दिलवर पाडवी, दिलीप पावरा, पिंटू पावरा, फुलसिंग वसावे, महेंद्र परिहार, रामेश्वर सुरनर, राहुल महाले, मुकेश पावरा यांनी ही कारवाई केली.