---Advertisement---

Snake bite in Jalgaon : सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ, कशी घ्याल काळजी ? जाणून घ्या

---Advertisement---

जळगाव : पावसाळा सुरु होऊन काही दिवस झाले असताना, सर्पदंश होण्याच्या घटनेत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी (१४ जुलै) जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन बालकांसह चौघांना सर्पदंश होऊन विषबाधा झाल्याची घटना समोर आली.

दरम्यान, चौघांवर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात सूत्रांकडून आले. मात्र, विषारी साप जीवघेणे ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर आज आपण सापापासून वाचण्यासाठी व सर्पदंश झाल्यास कशी काळजी घ्याल, याबाबत जाणून घेऊया.

सापापासून वाचण्यासाठी काय कराल ?

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. त्यानंतर कार्बनिक एसिड आणि फिनाईल शिंपडा. तुम्ही केरोसीनदेखील सिंपडू शकता. जर तुम्ही शेतात झोपत असाल तर जमिनीवर झोपू नका, दोन इंच वर झोपता येईल, अशी सोय करा. अडचणीच्या ठिकाणी हात टाकताना सर्वप्रथम चाचणी करा.

सर्पदंश झाल्यास काय कराल ?

सर्पदंश झाल्यास सर्वप्रथम तुम्ही त्या जागेवर पाण्याने किंवा साबणाने धुवू नका. त्या जागेवर थंड किंवा गरम शेक देऊ नका.
जखमेवर चिरा करू नका किंवा विष शोषणाचा प्रयत्न करू नका. तसेच त्या जागेवर झाडपाला, तेल, हळद लावू नका. मंत्र-तंत्रांवर विश्वास न ठेवता तात्काळ वैद्यकीय उपचार घ्या.

दोन बालकांसह चौघांना सर्पदंश

जळगाव : जिल्ह्यात सोमवारी (१४ जुलै) वेगवेगळ्या ठिकाणी दोन बालकांसह चौघांना सर्पदंश होऊन विषबाधा झाली. चौघांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. सैय्यद अजीज (वय ६५, रा. मारूळ), रोशनी गोपीचंद राठोड (वय १४, रा. फर्दापूर, ता. सोयगाव), गणेश दिलीप भिल (वय १५, रा. शिरसोली), पंकज कृपाल साबळे (वय २२, रा. गोद्री, ता. जामनेर) यांचा बाधितांमध्ये समावेश आहे. चौघांवर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---