---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात पावसाची दडी, हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात पाऊसच न बरसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे. पावसाळ्यातील महिना असतानाही जुलै महिन्याच्या पहिल्या १५ दिवसात पावसाने पाठ दाखवल्याने पिके संकटात सापडली आहेत. जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये पाण्याचा खडखडाट असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचं मोठे संकट पुढील काही दिवसात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पंधरा दिवसांपूर्वी खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. उगवण क्षमता चांगली आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. हीच स्थिती काही दिवस राहिली, तर पिके कोमेजू लागतील, यासाठी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

सुरुवातीच्या काळात चांगल्या पावसामुळे पेरण्या वेळीच झाल्या. शेतकऱ्यांनी कपाशी, मका, तूर, सोयाबीन यांसारख्या पिकांची लागवड केली आहे. मात्र, गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी, बाल्यावस्थेतील पिके कोमेजू लागली आहेत. ढगाळ वातावरण असूनही एप्रिल मे महिन्यासारख्या तापत्या उन्हामुळे पिकांची वाढ खुंटली आहे.

---Advertisement---

पिकांची वाढ खुंटली

सध्या शेतकरी खरिपातील नवांकुरित पिकांना डवरणी देत आहेत. मात्र, पावसाअभावी हे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे, तर येत्या काही दिवसांत पाऊस आला नाही, तर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी बियाणे आणि खतांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न आल्यास महागात घेतलेले बी-खत वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---