---Advertisement---

Shravan 2025 : यंदा 24 की 25 जुलै कधीपासून सुरु होणार श्रावण मास, पहिला श्रावणी सोमवार कधी? जाणून घ्या

---Advertisement---

Shravan 2025 : हिंदू धर्मात श्रावण मासला विशेष धार्मिक महत्त्व आहे. मात्र, श्रावण मास कधी सुरु होत आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. उत्तर भारतात श्रावण महिना आधी प्रारंभ होतो. त्यानुसार, उत्तर भारतात 11 जुलैपासून श्रावण मास प्रारंभ झाला आहे. तर, मराठी पंचांगानुसार, महाराष्ट्रात श्रावण मास अजून सुरु झालेला नाही. त्यानुसार, महाराष्ट्रात श्रावण मास कधी सुरु होत आहे? आणि यंदा कीती श्रावणी सोमवार येणार आहेत, जाणून घेऊया.

हिंदू धर्मात देवांचे देव महादेवाला विशेष महत्त्व आहे. महादेवाला श्रावण महिना समर्पित आहे. त्यामुळेच या महिन्याचं महत्त्व फार आहे. अत्यंत पवित्र असा हा महिना मानला जातो. श्रावणात अनेक व्रत-वैकल्ये,  उपवास केले जातात. श्रावणात भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास आपल्यावर शंकराची विशेष कृपा राहते.

या तिथीपासून सुरु होणार श्रावण मास

पंचांगानुसार, जुलै महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून म्हणजेच 25 जुलैपासून श्रावण मासला प्रारंभ होणार आहे. तर, 23 ऑगस्ट 2025 ला श्रावण अमावस्येला या श्रावण समाप्ती होणार आहे. यावेळी 4 श्रावणी सोमवार येणार आहेत. श्रावणात प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व आहे. श्रावणात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंध असे अनेक सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात.  

अशा आहेत श्रावणी सोमवार तिथी

पहिला श्रावणी सोमवार – 28 जुलै 2025

दुसरा श्रावणी सोमवार – 4 ऑगस्ट 2025

तिसरा श्रावणी सोमवार – 11 ऑगस्ट 2025

चौथा श्रावणी सोमवार – 18 ऑगस्ट 2025

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---