---Advertisement---

ऑपरेशन सिंदूर थांबले नाही, कुरापत केल्यास पाकिस्तानला पुन्हा धडा शिकवू : राजनाथसिंह

---Advertisement---

---Advertisement---

‘ऑपरेशन सिंद्र थांबवले नाही, तर स्थगित केले आहे. पाकिस्तानने पुन्हा कुरापत काढल्यास ते पुन्हा सुरू केले जाईल, अशी गर्जना संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी लोकसभेत केली. या अभियानात १०० पेक्षा जास्त अतिरेकी, त्यांचे पाठीराखे आणि प्रशिक्षक मारले गेले, असे ते म्हणाले.

‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेत चर्चा सुरू करताना राजनाथसिंह यांनी आपल्या जवळपास ५० मिनिटांच्या घणाघाती भाषणात विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व आक्षेपांचे आणि आरोपांचे मुद्देसूद खंडन केले. यावेळी गृहमंत्री अमित शाह, भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा सभागृहात उपस्थित होते.

कुणाच्या दबावाखाली ‘ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आले, हे पूर्णपणे चुकीचे आहे, उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे हे ऑपरेशन थांबवण्यात आले. भारताचा मुख्य उद्देश युद्ध छेडणे नव्हे, तर भारताविरुद्ध छुपे युद्ध पुकारणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणे हा होता, असे राजनाथसिंह म्हणाले.

भारताच्या हवाई दलाची प्रत्युत्तरातील प्रभावी कारवाई, सीमेवर भारतीय लष्कराने आक्रमकपणे दिलेले उत्तर आणि नौदलाच्याही तेवढ्याच दमदार कारवाईच्या शक्यतेमुळे पाकिस्तानला माघार घेणे भाग पडले. पाकिस्तानची ही माघार फक्त त्यांच्या लष्कराचे अपयश नाही, तर त्यांचे सैन्यबल आणि मनोबल हा दोघांचाही पराभव आहे.

‘ऑपरेशन सिंदूर मध्ये आमची किती विमाने पडली, असा प्रश्न विरोधक उपस्थित करीत असलेला प्रश्न देशातील जनभावनांचे प्रतिनिधित्व करीत नाही, तर आपण पाकिस्तानचे किती विमाने पाडली, असा प्रश्न त्यांनी विचारायला पाहिजे होता. ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाले का, या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. लक्ष्य जेव्हा मोठे असते, तेव्हा छोट्याछोट्या मुद्यांकडे लक्ष द्यायचे नसते, यामुळे देशाची सुरक्षा, सैनिकांचा सन्मान आणि उत्साह यावरून आमचे लक्ष विचलित होऊ शकते. विरोधी पक्षातील आमचे मित्र या ऑपरेशनवर योग्य असे प्रश्न उपस्थित करीत नाही, असे ते म्हणाले.

परीक्षेत निकाल महत्त्वाचा

राजनाथसिंह म्हणाले की, आपल्या लष्कराने पाकिस्तानी सैन्य ठिकाणांवर हल्ले चढवल्यानंतर पाकिस्तानने जवळपास पराभव मान्य करीत युद्धबंदीचे आर्जव आपल्याकडे केले होते. पाकिस्तानच्या लष्करी कारवाई महासंचालकांनी केलेल्या विनंतीनंतर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांत चर्चा झाली अन् युद्धबंदी लागू करण्यात आली. परीक्षेत निकाल काय लागला, हे महत्त्वाचे असते, आम्ही मुलांच्या गुणांकडे लक्ष द्यायला पाहिजे, याकडे नाही की परीक्षा सुरू असताना पेन्सिल तुटली.

आम्ही सुदर्शन चक्र उचलले

शठ्ये शाठ्यंम समाचरेत’ म्हणजे धर्माच्या रक्षणासाठी वेळ पडली तर सुदर्शन चक्रही चालवले पाहिजे, हे आम्ही ‘भगवान श्रीकृष्णाकडून शिकलो. प्रभू हनुमतांने बनवलेल्या लंकेवर हल्ल्याची योजनेप्रमाणेच आम्हीही योजना बनवली होती. आम्ही २००६ चा संसदभवनवरील हल्ला, २००८चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाहिला, आता खूप झाले. त्यामुळे आम्हाला सुदर्शन चक्र हातात घ्यावे लागले. भारताने आता दहशतवादाविरुध्द दृढ आणि सशक्त असे पाऊल आम्ही उचलले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---