---Advertisement---

जगातील सर्वांत मोठ्या गुहेत सापडला ३४ कोटी वर्षांपूर्वीचा दात

---Advertisement---

---Advertisement---

जगातील सर्वात मोठ्या गुहा केंटकीच्या मॅमथ केव्ह नॅशनल पार्कमध्ये सुमारे ३४ कोटी वर्षे जुन्या दाताचा शोध लागला आहे. पूर्वी अज्ञात असलेल्या प्राचीन शार्क प्रजातीतील एका जीवाश्माचा हा दात आहे. या प्रजातीला आता मॅकाडेन्स ओल्सोनी असे नाव देण्यात आले आहे, ती मिसिसिपीच्या उत्तरार्धातील स्टे. जेनेव्हिव्ह फॉर्मेशनमध्ये आढळली आहे.

सुमारे अर्धा इंच लांबीचा हा दात प्रागैतिहासिक सागरी जीवनाबद्दल मौल्यवान माहिती देतो. राष्ट्रीय उद्यान सेवेने ‘शार्क वीक’ सुरू झाल्यानंतर लगेचच या शोधाची घोषणा केली. यामुळे प्राचीन शार्कबद्दल जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता वाढली आहे. हा शोध प्राचीन सागरी जीवनाबद्दलच्या समजुतीत एक उल्लेखनीय भर आहे.

नैसर्गिक इतिहासाचे जतन आणि अभ्यास करण्याचे महत्त्व देखील अधोरेखित करते, असे अधीक्षक बार्कले ट्रिम्बल यांनी सांगितले. या शार्कच्या दातांची ठेवण गोलाकार आहे. यामुळे ते समुद्रातील लहान प्राणी सहज खाऊ शकतात. ही प्राचीन शार्क एक फुटापेक्षा कमी लांबीची असावी. तसेच तिचे खाद्य मॉलस्क आणि अळ्या असण्याची शक्यता आहे.

मॅकाडेन्स ओल्सोनीचे जीवाश्म स्टे. जेनेव्हिव्ह फॉर्मेशनमध्ये सापडले, ते अंदाजे ३३ ते ३४ कोटी वर्षापूर्वीचे आहे. त्या काळात, मॅमथ ही गुहा एका उबदार, उथळ समुद्रात बुडाली होती. यामध्ये क्रिनॉइड्स आणि कोरलसह अनेक जीवसृष्टी होती. हे संशोधन नॅशनल पार्क सर्व्हिस पॅलिओन्टोलॉजी प्रोग्राम, मॅमथ केव्ह नॅशनल पार्क आणि स्मिथसोनियन पॅलिओबायोलॉजी विभागातील शास्त्रज्ञांच्या पथकाने केले.

मॅकाडेन्स ओल्सोनी व्यतिरिक्त, संशोधकांनी आणखी एका प्राचीन शार्कचा अभ्यास केला, हेलोडस कोक्सानस, ज्याचे आता रोटुलाडेन्स असे नाव देण्यात आले आहे, ज्याचा अर्थ ‘व्हेल टूथ’ आहे. ही प्रजाती मॅकाडेन्स ओल्सोनीशी साम्य दर्शवते आणि प्राचीन सागरी जीवनाची विविधता अधोरेखित करते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---